कामशेत येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दिनांक 6 ऑक्टोबर ते दिनांक 10 ऑक्टोबर पर्यंत भव्य भजन स्पर्धा घेण्यात येत आहे. या भजन स्पर्धेला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ( Bhajan competition at Kamshet )
आयोजकांकडून, दिनांक 6 ऑक्टोबर रोजी बाल भजन ठेवण्यात आले होते. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी महिला भजन ठेवण्यात आले होते. तर, दिनांक 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी खुला गट भजन स्पर्धा घेण्यात येत आहे. यात प्रथम नाव नोंदणी केलेल्या 16 संघांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून यात मावळ तालुक्यातील तळेगाव, चिंचोली, ताजे, नायगाव, वाकसई, देवले, कुसगाव इत्यादी गावातील भजन संघांनी सहभाग घेतला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रत्येक दिवसाला घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या संघांमधून सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता फायनल म्हणजेच अंतिम फेरी होईल. यातून विजेत्या भजन मंडळ संघांना रोख रक्कम यासह पखवाज, तबला, विना, टाळ आदी वस्तूंसह प्रभू श्री विठ्ठलाची मूर्ती देण्यात येणार आहे. या स्पर्धेला परिक्षक म्हणून पंडित किरणजी परळीकर हे आहेत. तसेच श्री भैरवनाथ नवरात्र मंडळ, कामशेत (गावठाण) यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ( Bhajan competition at Kamshet )
अधिक वाचा –
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन, जाणून घ्या कधी आणि कुठे? I MLA Sunil Shelke Birthday
कोण होणार वडगावची महासुगरण 2022 ! आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी स्पर्धा, जाणून घ्या