मावळ तालुक्याचे ( Maval Taluka ) विद्यमान आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांचा 20 ऑक्टोबर रोजी वाढदिवस ( Birthday ) असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करत असतात. यंदाही आमदार शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळ तालुका मर्यादित भजन स्पर्धेचे ( Bhajan Competition ) आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री विठ्ठल परिवार मावळ आणि मोरया प्रतिष्ठान वडगाव यांच्या माध्यमातून या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा मावळ तालुका पुरतीच मर्यादित असणार आहे. शनिवार दिनांक 08 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 09 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजता या वेळेत ही स्पर्धा होईल. ( Bhajan Competition At Vadgaon Maval )
वडगाव मावळ शहरातील श्री पोटोबा महाराज मंदिर देवस्थानच्या प्रांगणात ही स्पर्धा होणार असून, मावळ तालुक्यातील सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व भजनी मंडळ व भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी, स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयुर प्रकाशराव ढोरे यांनी केले आहे. ( Bhajan Competition At Vadgaon Maval On Occasion Of MLA Sunil Shelke Birthday )
अधिक वाचा –
‘कुलदेवतेच्या साक्षीने सांगतो गहुंजेची पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर करून घेतली’ – आमदार सुनिल शेळके
PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022