जल जीवन मिशन ( Jaljeevan Mission ) अंतर्गत मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) गहुंजे गावातील ( Gahunje ) नळ पाणीपुरवठा योजनेचा ( Tap water supply scheme ) भूमिपूजन समारंभ ज्येष्ठ मान्यवरांच्या आणि महिला-भगिनींच्या हस्ते रविवारी (2 ऑक्टोबर) रोजी संपन्न झाला. या समारंभाला आमदार सुनिल शेळके ( Maval MLA Sunil Shelke ) यांच्यासह पंचक्रोशीतील जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, उपसरपंच,सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महिलांच्या हस्ते भूमिपुजन…
या भूमीपुजन समारंभाला खुद्द आमदार सुनिल शेळके उपस्थित होते. परंतू. आमदार शेळके यांनी उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते भुमिपूजनाच्या सुचना दिल्या. त्यानुसार या विकासकामाचे भूमिपूजन महिला प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. खास बाब म्हणजे यावेळी महिला वर्गाने देखील विशिष्ट प्रकारच्या साड्या घालून आणि फेटे बांधून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती.
आमदार सुनिल शेळकेंचे मनोगत…
काही दिवसांपूर्वीच माजी आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत गहुंजे पाणीपुरवठा योजनेचे भुमीपूजन झाले होते आणि त्यावरुन तालुक्यातील राजकीय वातावरण देखील गरम झाले होते. त्यामुळे आज पुन्हा नारळ फुटत असताना आमदार शेळके काय बोलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले होते.
आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून 4 कोटी 36 लाख रूपये विकासनिधीतून ही पाणीपुरवठा योजना सुरू होत आहे. त्यामुळे जाहीर सभेत बोलताना आमदार शेळके यांनी, ‘कुलदेवतेच्या साक्षीने सांगतो गहुंजेची पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर करून घेतली’ असे म्हटले. ( Jaljeevan Mission Tap water supply scheme Gahunje village Maval MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
गहुंजे नळ पाणीपुरवठा योजनेचा भुमीपूजन समारंभ संपन्न; पण तालुक्यात वेगळीच चर्चा!
शिळींब ग्रामपंचायतीला गांधी जयंतीचा विसर; गावातील तरुणांनी बंद कार्यालयासमोर साजरी केली गांधी जयंती, तालुक्यात होतेय चर्चा