Dainik Maval News : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) निगडी ते तळेगाव आणि वडगाव मावळ मार्गावर बसेस धावत आहेत. मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी बसशेड किंवा बस थांब्याची पाटीच नसल्यामुळे प्रवाशांना बस थांबा नेमका कुठे आहे, हेच कळत नाही.
ग्रामीण भागातील बहुतांश मार्गांवर हीच परिस्थिती आहे. परिणामी प्रवाशांना एकतर पायपीट करावी लागते किंवा रिक्षा आणि खासगी वाहनांचा वापर करावा लागतो.
लोणावळा, वडगाव मावळ आणि तळेगावला जाणाऱ्या प्रवाशांसाठी निगडी येथून बससेवा सुरू करण्यात आली आहे. निगडी पवळे चौक ते वडगाव मावळ (३०५), निगडी ते लोणावळा मार्गे कामशेत (३६८), निगडी ते टाकवी (३७१) आणि निगडी ते ऊर्से (३४१), कात्रज ते वडगाव मावळ (२२८) या मार्गांवर बस उपलब्ध असून, दररोज ४२ ते ४५ फेऱ्या होतात.
पीएमपीएमएलच्या बसेसने मावळातील शेकडो प्रवासी प्रवास करतात. त्यातून प्रशासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. मात्र या मार्गावरील पीएमपीएमएल बस थांब्यांची अनावस्था झाली आहे. कित्येक ठिकाणी बसशेड नाहीत. नवख्या माणसाला तर बसथांबा कुठे आहे हे कळतच नाही. पीएमपीएमएल प्रशासनाने प्रवाशांच्या अडचणी समजून घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे