व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे

वडगाव मावळ येथील राजमुद्रा फूड जंक्शन परिसरात जिल्हा बँकेच्या संचालकांच्या उपस्थितीत या वितरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 24, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Indrayani rice seed distribution center opens at Vadgaon Maval Farmers will get high quality seeds

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि अधिक उत्पादनक्षम इंद्रायणी भाताचे बियाणे सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मावळ अ‍ॅग्रोच्या वतीने वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना थेट आणि प्रमाणित बियाणे मिळण्याचा मार्ग खुला झाला असून शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वडगाव मावळ येथील राजमुद्रा फूड जंक्शन परिसरात जिल्हा बँकेच्या संचालकांच्या उपस्थितीत या वितरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकार महर्षी माऊली दाभाडे आणि तुकाराम ढोरे यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी दाभाडे, सहाय्यक निबंधक नवनाथ अलमट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास मालपोटे, भाऊसाहेब ढोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मावळ अ‍ॅग्रोमार्फत शेतकऱ्यांसाठी इंद्रायणी भाताचे दोन प्रकारचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात ‘ब्रीडर बियाणे’ (मूळ बियाणे) आणि ‘प्रमाणित बियाणे’ या दोन प्रकारांचा समावेश आहे. अधिक उत्पादन क्षमता, उत्तम दर्जा आणि रोगप्रतिकारक क्षमता ही या बियाण्यांची वैशिष्ट्ये असल्याचे आयोजकांनी सांगितले. शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे आणि विश्वासार्ह बियाणे मिळावे यासाठी मागील काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

यासोबतच शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी मावळ अ‍ॅग्रोने विशेष प्रयत्न केले आहेत. यापूर्वी व्यापाऱ्यांकडून भाताला प्रतिकिलो १६ ते १८ रुपये दर मिळत होता. मात्र मावळ अ‍ॅग्रोच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहिल्या वर्षी २६ रुपये, दुसऱ्या वर्षी २८ रुपये, तिसऱ्या वर्षी ३२ रुपये आणि चौथ्या वर्षी ३४ ते ३६ रुपये प्रतिकिलो असा दर मिळवून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच ब्रँडिंगद्वारे विक्री झालेल्या भाताला ४० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाल्याचे सांगण्यात आले. आगामी हंगामात याहून अधिक चांगला दर मिळवून देण्याचा मानसही संस्थेकडून व्यक्त करण्यात आला.

या वितरण केंद्रामुळे मावळातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, योग्य मार्गदर्शन आणि चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न
– मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न
– पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ
– पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

बेकायदा गर्भलिंग तपासणीचे रॅकेट मावळपर्यंत… श्रीरामपूर पोलिसांकडून वडगावात अवैध सोनोग्राफी मशीन जप्त

Next Post

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.