Dainik Maval News : शिरवता वन बचाव संघाच्या वतीने शिरदे-जांभवली गावात सह्याद्री, जंगल आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ग्रामसभा व जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ग्रामस्थ, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ‘टाटा गो बॅक’च्या जोरदार घोषणा देत टाटा कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाचा निषेध केला. रोजगाराचे आमिष दाखवून स्थानिक नागरिकांची दिशाभूल व फसवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही, असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला.
“आम्ही आमचा वनहक्क कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. आमच्या पूर्वजांनी जपलेली जंगलसंपत्ती, सह्याद्री आणि नैसर्गिक वारसा वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. वेळ पडल्यास एकाही झाडाला हात लावू देणार नाही आणि जंगलतोड रोखण्यासाठी चिपको आंदोलन करण्यासही आम्ही तयार आहोत,” असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी या बैठकीत व्यक्त केला.
या बैठकीत महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत जंगल आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. गावातील वनसंपत्ती, वन्यजीव आणि पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीस उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ
सुशीला दिलीप बगाड (सरपंच), हिराताई काशिनाथ बगाड (पोलीस पाटील) यांसह अनंता रामभाऊ वाजे, पांडुरंग कोकाटे, जिजाबा बगाड, शांताराम बगाड (माजी सरपंच), सदु दाते, मधू बगाड, नथु बगाड, सुंदराबाई बगाड, मथाबाई बगाड, शिल्पा बगाड, बाळू खरात, धोंडू वाजे, शिवराम ताते, दौलत ठोसर, आकाश ठोसर, सूरज कदम, आदिनाथ ठोसर, बाळू पवार, ज्ञानेश्वर कदम, बाळू ठोसर, दिनेश कदम, रमेश कदम, कुंडलिक कदम, बाळू कदम आदी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’

