व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, November 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजितदादांनी पाहिलेले पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचना

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 23, 2026
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Everyone work together to fulfill the vision Ajitdada has for development of Pimpri-Chinchwad said DCM Sunetra Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी आदरणीय अजितदादांनी दिलेला वेळ, घेतलेले कष्ट आणि दाखवलेली निष्ठा यांची जाणीव प्रत्येकाला आहे. या शहराला सुंदर, नियोजनबद्ध आणि विकसित शहर बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. शहर घडवताना त्यांनी अनेक माणसेही घडवली. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. शहराच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी खंबीरपणे पाठीशी असून शहरातील सुरू असलेली सर्व विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये श्रीमती पवार यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे डॉ. राजेश देशमुख, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, दुष्काळी परिस्थिती, वाढती लोकसंख्या आणि बदलत्या नागरी गरजांमुळे अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. अजितदादांच्या विकासाच्या दृष्टीने मोठ्या अपेक्षा होत्या. सर्वांनी शहराच्या विकासासाठी विशेष लक्ष द्यावे, ही त्यांची इच्छा होती. शहराच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक बाबीसाठी ते नेहमी निधी उपलब्ध करून देत असत. आज देशात पिंपरी-चिंचवड शहराचा उल्लेख झाला की अजितदादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

मोशी येथील कचरा दुर्घटना अत्यंत वेदनादायी होती. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मोशी येथील दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी कचरा नेणे थांबवण्यात आले. त्यानंतर शहरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट संदर्भात माहिती घेतली. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे. मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. या प्रकल्पाचे काम सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती घेऊन प्रकल्पाचे काम प्रलंबित न ठेवता ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

दुष्काळी परिस्थिती आणि स्थलांतराचे नियोजन करा
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे विविध भागांतून नागरिक रोजगार आणि इतर कारणांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक निर्माण होणारा लोकसंख्येचा भार लक्षात घेऊन पाणीपुरवठा, निवारा, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, पवना आणि इंद्रायणी नद्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी तसेच नदी पुनरुज्जीवनाच्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य
पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी, यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच नाशिक फाटा ते एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगून राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.

पिंपरी-चिंचवडला पुन्हा एकदा देशातील अग्रगण्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. अजितदादांनी या शहरासाठी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी महापालिका प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील ऐतिहासिक विसापूर किल्ल्यावर अत्याधुनिक ‘ऑडिओ गाईड’ सुविधेचा शुभारंभ ; तीन भाषांमध्ये मिळणार माहिती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Everyone work together to fulfill the vision Ajitdada has for development of Pimpri-Chinchwad said DCM Sunetra Pawar

अजितदादांनी पाहिलेले पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

November 23, 2026
Launch of audio guide facility at historic Visapur Fort in Maval by ASI Mumbai

मावळमधील ऐतिहासिक विसापूर किल्ल्यावर अत्याधुनिक ‘ऑडिओ गाईड’ सुविधेचा शुभारंभ ; तीन भाषांमध्ये मिळणार माहिती

November 23, 2026
Photo Courtesy : Team Dainik Maval

Vadgaon Maval : अतिक्रमणाच्या भस्मासूरामुळे वडगाव मावळ शहरातील मुख्य बाजारपेठ रस्त्यासह सेवा रस्ते झाले अरूंद

November 23, 2026
Sub-national Pulse Polio Immunization Campaign at Karla Maval launched by ZP Chairperson Dipali Hulawale

कार्ला येथे उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ; जिल्हा परिषदेच्या सभापती दिपाली हुलावळे यांच्या अभियानाचा शुभारंभ

November 23, 2026
Roadworks covering 418 km for Pune Grand cycle Tour widening repairs strengthening underway in five phases

पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू

November 23, 2026
3832 Anganwadi in maharashtra to become smart Minister Aditi Tatkare shares information

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

November 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.