Dainik Maval News : गावखेड्यांचा तालुका असलेल्या मावळ तालुक्यात आजही एसटी महामंडळाची बस हा सामान्यांसाठी वाहतुकीचा प्रमुख आधार आहे. याच एसटी बस सेवेला आता सुरक्षिततेची जोड मिळणार आहे. तालुक्यातील 9 ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून ‘प्रवासी निवारा बस थांबा’ बांधण्यात येणार आहेत, यासाठी एकूण 1 कोटी 20 लाख रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. या विशेष निधीच्या उपलब्धतेसाठी आमदार सुनील शेळके यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.
मावळ तालुक्यातील रस्ते वाहतूक व्यवस्था सुधरावी यासाठी आमदार सुनील शेळके हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत गेल्या काही वर्षांत मावळच्या कानाकोपऱ्यात सुसज्ज रस्त्यांचे जाळे तयार होताना दिसत आहे. याशिवाय सामान्य प्रवाशांच्या अवाक्यातील एसटी प्रवास हा अधिक सुलभ व सुरक्षित व्हावा याकरिता सुसज्ज रस्त्यांसोबत, चांगल्या बसेस आणि याच जोडीला आता अत्याधुनिक बस थांब्यांची उभारणी होत आहे, ही निश्चितच मावळकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
एकूण 9 ठिकाणी उभारणार अत्याधुनिक बस थांबे
तळेगाव दाभाडे ( 20 लक्ष), कामशेत (20 लक्ष), वडगांव मावळ (20 लक्ष), सोमाटणे फाटा (20 लक्ष), कान्हे फाटा (20 लक्ष), वडेश्वर (20 लक्ष), पवनानगर (20 लक्ष), इंदुरी (20 लक्ष) आणि खंडाळा (20 लक्ष) या ठिकाणी अत्याधुनिक बस थांबे उभारण्यात येतील.
महिला प्रवासी वर्गातून स्वागत
एसटी प्रवास हा खासकरून महिला वर्ग आणि वयोवृद्धांसाठी सोयीचा मानला जातो. मावळच्या गावखेड्यातील महिलांना प्रवासासाठी एसटी बस ही सोयीची ठरते. परंतु अनेक ठिकाणी आजही चांगल्या प्रकारचे बस थांबे नाहीत. मात्र आता लवकरच प्रमुख 9 ठिकाणी अत्याधुनिक ‘प्रवासी निवारा बस थांबा’ तयार होतील, याचे महिला प्रवाशांकडून स्वागत होत आहे.
आमदार शेळके यांनी मानले राज्य सरकारचे आभार
“चांगले रस्ते, चांगली वाहने जितकी आवश्यक, तितकीच सुसज्ज अशी बस थांब्यांची सोय असणेही गरजेचे असते. याच हेतूने मावळमधील 9 महत्वाच्या व अत्यावश्यक ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून अत्याधुनिक बस थांबे उभारण्याकरिता १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा, सुरक्षित निवारा आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे. याबद्दल राज्याच्या महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार.” – श्री. सुनील शेळके (आमदार – मावळ)
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’

