व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

स्थानिक नागरिक, आजी-माजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याची राज्य सरकारकडे मागणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 23, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी उचलण्यात येत असलेल्या पवना नदीमध्ये मैलामिश्रित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. जनावारांचे मांसही नदीपात्रात आढळत आहे. नदीतील पाणी अतिशय दूषित असून पिण्यायोग्य नसल्याचा रिपोर्ट प्रयोगशाळेने दिला आहे. हे पाणी पिल्याने नागरिकांना विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागणे अतिशय आवश्यक आहे. याबाबत स्थानिक नागरिक, आजी-माजी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. शहरातील पाण्याची परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पवना बंदिस्त प्रकल्प जलवाहिनी मार्गी लावण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्याची विनंती केली आहे. मावळातील स्थानिक नागरिक, शेतकरी यांचे काही प्रश्न आहेत. ते जाणून घ्यावेत. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आंदोलक, विविध संघटनांनाबरोबर संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढावा, असे खासदार बारणे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनाही याबाबतचे निवेदन दिले आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३२ लाखांवर पोहोचली आहे. शहर चारही बाजूने विस्तारत असून झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी अपुरे पडत आहे. महापालिका पवना नदीतील रावेत बंधाऱ्यातून एका दिवसाला ५५० एमएलडी पाणी उचलत आहे. हे पाणी अतिशय अशुद्ध आहे. नदीमध्ये मैलामिश्रित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. जनावारांचे मांसही नदीपात्रात आढळत आहे. त्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. प्रयोगशाळेनीही तसा अहवाल दिला आहे. पवना नदी मृत झाली आहे.

आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीतील निघोजे बंधाऱ्यातून उचलले जाते. हे पाणीही अतिशय अशुद्ध आहे. दोन्ही नदीतून उचलण्यात येणारे पाणी अशुद्ध आहे. हे पिण्यायोग्य राहिले नाही. हे पाणी शुद्ध करुन नागरिकांना वितरित केले जाते. परंतु, हे पाणी पिल्याने नागरिकांना विविध वैद्यकीय आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे पाणी पिल्याने जीवितहानीही होऊ शकते. नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी योजना करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी बाधित शेतकरी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांना विश्वासात घ्यावे. चर्चेतून तोडगा काढावा. बंदिस्त जलवाहिनी झाल्यास शुद्ध आणि वाढीव पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांना पुरेसे, मुबलक पाणी उपलब्ध होईल. पाणी टंचाईच्या तक्रारींमध्ये घट होईल, असेही खासदार बारणे म्हणाले.

बंदिस्त जलवाहिनीअभावी बाराही महिने नदीत पाणी
लवादाने चार महिनेच नदीतून पाणी उचलण्यास परवागी दिली आहे. उर्वरित आठ महिने बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी उचलणे बंधनकारक आहे. परंतु, बंदिस्त जलवाहिनी झाली नाही. त्यामुळे बाराही महिने नदीतूनच पाणी उचलावे लागत आहे. नदीतून उचलण्यात येणारे पाणी अतिशय अशुद्ध असते. त्यामुळे नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होतो, याकडेही खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले.

पवना नदीतील पाणी अतिशय अशुद्ध आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे. सर्वांशी सखोल चर्चा करुन यातून तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. – श्रीरंग बारणे, खासदार मावळ लोकसभा

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न
– मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न
– पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ
– पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

Next Post

बेकायदा गर्भलिंग तपासणीचे रॅकेट मावळपर्यंत… श्रीरामपूर पोलिसांकडून वडगावात अवैध सोनोग्राफी मशीन जप्त

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Illegal sex determination racket reaches Maval Srirampur police seize illegal sonography machine in Vadgaon

बेकायदा गर्भलिंग तपासणीचे रॅकेट मावळपर्यंत... श्रीरामपूर पोलिसांकडून वडगावात अवैध सोनोग्राफी मशीन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.