लोणावळा शहर पोलिसांच्या ( Lonavla City Police ) हद्दीत आज (रविवार, 2 ऑक्टोबर) रोजी घडलेल्या एका घटनेने सध्या सर्वजण हैराण झालेत. शुल्लक पाण्याची बाटली आणि त्यामुळे पुढे घडलेलं सर्व प्रकरण यामुळे पोलिसांसह इतर सर्व यंत्रणांना फुकटचा मनस्ताप झाला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रकरण काय?
अविनाश आप्पा वाघमारे (वय 36 वर्ष, रा. घाटकोपर – ईस्ट मुंबई) नावाच्या व्यक्तीने लोणावळा जवळील साईकृपा हॉटेल एन एच 04 येथे असताना हॉटेलचे मॅनेजर किशोर पाटील यांनी पाण्याचे बाटलीची किंमत जास्त लावल्याचा राग मनात धरुन थेट पोलिसांनाच फोन केला. मात्र फोन करताना, हॉटेल मॅनेजर आणि कर्मचारी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने 100 नंबरला कॉल करून ‘महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन चालू आहे,’ ही खोटी माहिती दिली. फोन करतेवेळी अविनाश आप्पा वाघमारे हा दारूच्या नशेत होता. ( Fake phone call to Lonavala police )
हेही वाचा – लोणावळा पोलिस चौकीबाहेर राडा, वाद मिटवायला गेलेल्या पोलिसालाही धक्काबुक्की, गुन्हा दाखल
पुढे पोलिसांनी या फोननंतर तपास सुरु केला तेव्हा, हा सर्व प्रकार खोटा असून जाणीवपूर्वक केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अक्षय प्रकाश वायदंडे (लोणावळा शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी आरोपी अविनाश आप्पा वाघमारे (वय 36 वर्ष, रा. घाटकोपर – ईस्ट मुंबई) याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनी बावकर हे करत आहेत. ( Conspiracy to kill Chief Minister Eknath Shinde Fake phone call to Lonavala police )
अधिक वाचा –
शिळींब ग्रामपंचायतीला गांधी जयंतीचा विसर; गावातील तरुणांनी बंद कार्यालयासमोर साजरी केली गांधी जयंती, तालुक्यात होतेय चर्चा
वेट अँड जॉय वॉटर पार्क व्यवस्थापनाचा तुघलकी निर्णय, कामगारांचा कंपनीबाहेर ठिय्या, 300 कुटुंबाचे भवितव्य दावणीला