केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित इंडियन स्वच्छता लीग – 2022 मध्ये लोणावळा नगर परिषद अव्वल ठरली आहे. 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या असलेल्या देशातील एकूण 1850 शहरातून लोणावळा शहराने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांचे नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे वितरण झाले. ( Lonavla Municipal Council 1st In Indian Cleanliness League )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री कौशल किशोर कौशल किशोर, स्वच्छ भारत मिशनच्या सचिव रूपा मिश्रा, उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव निकुंज श्रीवास्तव व अमृत अभिजात यांच्या हस्ते इंडियन स्वच्छता लीग 2022 अव्वल क्रमांकाचा पुरस्कार लोणावळा नगर परिषदेच्या वतीने नगर अभियंता वैशाली मठपती, यशवंत मुंडे, दत्तात्रेय सुतार, विजय लोणकर, शहर समन्वयक अक्षय पाटील यांनी स्विकारला.
भारताच्या 75व्या स्वांतत्र्य महोत्सवानिमित्त पर्यटनस्थळांसाठी इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले होते. लोणावळा नगरपरिषदेने यात सहभाग घेतला होता. मुख्याधिकारी पंडित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा नगरपरिषदेने खंडाळा आणि भुशी या पर्यटन स्थळांवर स्वच्छता मोहीम, पथ नाट्य, प्लॉग अ थॉन आदी कार्यक्रम घेतले होते. ( Lonavla Nagar Parishad 1st In Indian Cleanliness League )
अधिक वाचा –
‘सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव येथे थांबा द्या, पुणे-लोणावळा फेऱ्या पुर्ववत करा’ आदी मागण्यांसाठी मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन
लोणावळा ग्रामीण आणि स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; बनावट सोन्याच्या विटा विकणाऱ्या टोळीचा म्होरक्या गजाआड