लोणावळा ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ( Lonavala Rural and Local Crime Branch ) धडक कारवाई करत बनावट सोन्याच्या विटा आणि बनावट डायमंडटची विक्री करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला गजाआड ( Gang leader Arrested ) केले आहे. एका कंपनी मालकाची फसवणूक करुन त्यावा 10 लाखांचा गंडा घालतल्यानंतर पोलिसांनी तपास करत असताना ही कौतुकास्पद कामगिरी केली.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मुळ मुंबई येथील राहणारा समद हमीद मकानी (वय 53, व्यवसाय सॉफ्टवेअर कंपनी मालक) यास काही दिवसापूर्वी जेरबंद केलेल्या आरोपीने ओळख करून घेत कर्नाटक, बेंगलोर या ठिकाणी जुने घर पाडण्याचे काम करत असताना घरात सोन्याच्या विटा आणि डायमंडची पिशवी मिळून आली आहे, असा खोटी माहिती दिली. यात मिळालेले सोने विक्री करण्यासाठी मला मदत करा, अशी गळ घातली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच, आर्थिक अडचणीचे कारण सांगत सध्या 10 लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी कंपनी मालकाला बनावट सोन्याची विट आणि बनावट डायमंड ( Selling Fake Gold Bricks And Fake Diamonds ) देऊन त्याची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे समजताच कंपनी मालकाने याची 22 सप्टेंबर रोजी पोलिसांत फिर्याद दाखल केली.
त्यानंतर, सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस निरिक्षक अशोक शेळके यांना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकामार्फत करत असताना दिनांक 27 सप्टेंबर रोजी गुन्ह्यातील संशयित आरोपी बाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
हेही वाचा – मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री विचित्र अपघात, ट्रक चालकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पाहा थरारक Video
त्याआधारे आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी करून तपास केला असता त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. संशयित आरोपी भिमा गुलशन सोळंकी (रा. बडोदा गुजरात, सध्या रा. देहूरोड, पुणे) यास वैद्यकीय तपासणी करून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 406, 417, 419, 420, 504, 506, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

तसेच अशा प्रकारे आणखीन काही नागरिकांची फसवणूक झालेली असल्यास त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी जनतेला केले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधीकारी ढोले पाटील यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सपोनि सुनिल माने, सपोनि नेताजी गंधारे, सपोनि सचिन रावळ, पो.स.ई. प्रदीप चौधरी, सहा.फौजदार प्रकाश वाघमारे, सहा.फौजदार हनुमंत पासलकर, सहा.फौजदार युवराज बनसोडे, पो.हवा. राजु मोमीन, पो.ना. बाळासाहेब खडके, पो.ना. शरद जाधवर, पो.कॉ. धिरज जाधव, पो.कॉ. प्राण येवले, म.पोना. मनिषा डमरे, चा.पो.कॉ. दगडू विरकर, पो.कॉ. मच्छिंद्र पानसरे यांनी केली आहे. ( Lonavala Rural and Local Crime Branch Arrested Gang leader Who Selling Fake Gold Bricks And Fake Diamonds )
अधिक वाचा –
लोणावळा पोलिस चौकीबाहेर राडा, वाद मिटवायला गेलेल्या पोलिसालाही धक्काबुक्की, गुन्हा दाखल
धक्कादायक! लोणावळ्यात 15 वर्षीय मुलाला फुस लावून पळवून नेले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल I Lonavla Crime