व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

नोंदणी प्रक्रियेसाठी आधारकार्ड, फार्मर आयडी आणि सातबारा अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 11, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल
Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

Photo Courtesy : AI Generate Image


Dainik Maval News : खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) ही ऑनलाइन खत वितरण प्रणाली राज्यातील शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) या नवीन ऑनलाइन खत वितरण प्रणालीमुळे शेतकरी, कृषी सेवा केंद्र चालक अडचणीत सापडले आहेत. ओटीपी, थंब मॅच, क्यूआर कोड, सर्व्हर डाऊन आणि इंटरनेट समस्यांमुळे खत खरेदीची प्रक्रिया संथ झाली असून अनेक शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ही ऑनलाइन प्रणाली रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन खत विक्री सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल (स्मार्ट फोन) नाहीत, तर अनेकांना तांत्रिक साक्षरते अभावी ॲप वापरणे कठीण जात आहे. शासनाच्या नवीन निर्देशानुसार, खत खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना अगोदर ऑनलाइन बुकिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोणत्या शेतकऱ्याला नेमकी किती खताची मात्रा मिळणार, याचे नियंत्रणही प्रणालीद्वारे होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नोंदणी प्रक्रियेसाठी आधारकार्ड, फार्मर आयडी आणि सातबारा अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्यातच वारंवार सर्व्हर डाऊन होणे आणि इंटरनेटच्या समस्यांमुळे ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. तसेच, यामुळे शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पिकांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी या नवीन जाचक नियमांमुळे अधिकच भरडला जात आहे.

शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांच्या मते, नव्या ॲपचा वापर करण्यासाठी उच्चगती इंटरनेट आवश्यक आहे. अनेक गावांमध्ये अजूनही नेटवर्कची समस्या कायम असल्याने ॲप सुरळीत चालत नाही. याशिवाय ॲपमधील बहुतांश माहिती इंग्रजी भाषेत असल्याने सामान्य शेतकऱ्यांना प्रक्रिया समजणे कठीण जात आहे. परिणामी खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना वारंवार कृषी सेवा केंद्रांचे फेरे मारावे लागत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन


dainik maval jahirat

Previous Post

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

Next Post

पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी २ एकर जागा देण्याबाबत शासन सकारात्मक; पुनर्वसनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Decisive momentum for rehabilitation of Pawana Dam victims Maval which pending for decades

पवना धरणग्रस्तांना प्रत्येकी २ एकर जागा देण्याबाबत शासन सकारात्मक; पुनर्वसनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.