व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

मुंबईत मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन संपन्न

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 11, 2026
in महाराष्ट्र
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२६ (मंगळवार, ९ जून) यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवनासाठी जागा देण्याची मागणीही मान्य करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

व्यासपीठावर महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते गौर गोपाल दास, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी माध्यम समूहाच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव प्रशांत ननावरे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

बावनकुळे व गौर गोपाल दास यांचा विशेष सन्मान
महसूल खात्यात काम करताना ऐतिहासिक व क्रांतीकारक निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा, तसेच आपल्या ओघवत्या वाणीने तरुण पिढीत चैतन्य निर्माण केल्याबद्दल गौर गोपाल दास यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “माझ्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा मोठा वाटा आहे. समाजाचा आरसा बनवून पत्रकार आम्हाला विविध कामे सुचवतात. चुका दाखवून देतात. त्यामुळे आधी प्रभावी विरोधक म्हणून आम्हाला काम करता आले आणि आता आम्ही लोकाभिमुख राज्यकारभार करून शकत आहोत. पत्रकारांचे राज्याच्या विकासामध्ये योगदान मोठे आहे.”

ते पुढे म्हणाले की, पुणे-मुंबई प्रमाणे राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा दिली जाईल. पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत वेळोवेळी निर्णय घेतले आहेत तसेच भविष्यातही घेण्यात येतील.

“वृत्तपत्र वाचूनच मराठी शिकत आहे” – राज्यपाल
यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, “महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून काम करत असताना मी मराठी भाषा देखील शिकत आहे. मराठी वृत्तपत्रांचा मला त्यासाठी उपयोग होत आहे. यावेळी मी इंग्रजीत बोलत असलो तरी पुढच्या वेळी मी मराठीत भाषण करीन.” कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेची गुणवत्ता अधिक वाढण्यास मदत होईल. पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

“पत्रकारांनी सत्य मांडताना घाबरू नये” – गौर गोपाल दास
‘पत्रकारांचे मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर गौर गोपाल दास यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “अलीकडे आपली नोकरी टिकवण्यासाठी पत्रकार अनेक दडपणांखाली काम करताना दिसतात. बहुतांश पत्रकारांनी समाजापुढे सत्य मांडण्यासाठी पत्रकारिता हा व्यवसाय स्वीकारलेला असतो. पत्रकारांना अनेक गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, पण त्यातूनही मार्ग काढत पत्रकारांनी यथाशक्ती सत्याची मांडणी करावी. त्यामुळे त्यांची घुसमट कमी होऊन त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभेल.”

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांच्या योगदानाबाबत गौरवोद्गार काढले. मृणालिनी नानिवडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
हिंदुस्तान टाइम्सचे डिजिटल संपादक हारीस शेख यांनी प्रात्यक्षिकांसह पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. “एआय हा पत्रकारांसाठी मदतनीस आहे, मात्र तो पत्रकार होऊ शकत नाही,” असे ते म्हणाले.

आदर्श पत्रकारिता पुरस्कार
यावेळी भारती अत्रे-सहस्त्रबुद्धे, इनपुट एडिटर, एबीपी माझा ; संजय मलमे, संपादक, नवराष्ट्र ; गणेश मोरे, इनपुट हेड, झी 24 तास ; प्रकाश सावंत, संपादक, नवशक्ती ; शिवाजी शिंदे, इनपुट एडिटर, साम टीव्ही ; आणि शैलेंद्र शिर्के, संपादक, पुण्यनगरी यांना आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक कृतज्ञता सन्मान
अनुप मोरे, संस्थापक-अध्यक्ष, अनुप मोरे सोशल फाउंडेशन आणि नीलय मेहता, नीलया एज्युकेशन, पुणे यांना सामाजिक कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला.

राज्यभरातून आलेल्या पत्रकार सदस्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या यावेळी मांडल्या. मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी आभार मानले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन


dainik maval jahirat

Previous Post

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Next Post

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची 'डिजिटल' कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.