Dainik Maval News : मावळ तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावपातळीपर्यंत सक्रीय होऊन जनतेशी संपर्क वाढवावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांनी केले. मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी नगराध्यक्षा ॲड. रंजना भोसले, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव तसेच पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळालेल्या नरेंद्र बनसोडे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, तळेगाव शहराध्यक्ष डॉ. विशाल वाळुंज, ॲड. खंडुजी तिकोणे, रोहिदास वाळुंज, असलम शेख, राजू शिंदे, सम्राट कडोलकर, राजीव फलके, राजू असवले, सहादू आरडे, शांताराम नरवडे, एकनाथ येवले, युवक अध्यक्ष संदीप सातकर, प्रतिमा हिरे, रूपाली क्षीरसागर, भरत दळवी, अनिस तांबोळी, नीलेश अगरवाल, अक्षय पोटे आदी उपस्थित होते.
यावेळी कमलाकर सातव यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, महागाई, शिक्षण क्षेत्रातील समस्या तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नांसाठी पक्षाची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटन बळकट करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात नरेंद्र बनसोडे यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी मतदार नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ॲड. रंजना भोसले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मावळ तालुक्यात काँग्रेसच्या संघटनात्मक कामात पुन्हा सक्रिय सहभाग घेण्याचे संकेत दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पक्षाला आगामी काळात अधिक बळ मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम
– खासदार श्रीरंग बारणे : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती
– आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान
– तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


