व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी कॅफेचालक आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 8, 2026
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Image


Dainik Maval News : बारा वर्षीय मुलीचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच, आणखी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तळेगाव दाभाडे येथे हा धक्कादायक प्रकार घडला.

या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणजे पीडितेचा मित्र आणि त्याचा मित्र ज्याने पीडितेचे अश्लिल फोटो व्हायरल केले, या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना अटक केली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी कॅफे मालकाविरोधात देखील कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित १७ वर्षीय मुलाने पीडित १२ वर्षीय मुलीसाेबत मैत्री केली. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान अल्पवयीन मुलाने विविध प्रकारे धमकावले. तुझी बदनामी करेल, तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी देऊन पीडितेकडून काही खासगी माहिती आणि फोटो सोशल मीडियावरून मिळवले. त्यानंतर हे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करून पीडितेचा विनयभंग केला.

दरम्यान, पीडित मुलीने अल्पवयीन मुलाला फोटो पाठवले होते. ते फोटो सर्वांना पाठवण्याची धमकी आरोपींनी दिली. त्याआधारे तिला धमकावत तिच्यावर १० आणि १४ मे रोजी जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले. कॅफे चालकाने त्याच्या कॅफेमध्ये अशा प्रकारांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी कॅफेचालक आणि इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले की, ‘पीडित मुलगी आणि तिची आई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. तिच्या मित्रांनी तिचे न्यूड फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिने तक्रार केली. त्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास करताना आणि पीडितेची चौकशी करताना असे निदर्शनास आले की, तळेगावमधील एका कॅफेमध्ये एका मुलाने तिला सोबत नेऊन अत्याचार केला. यासंदर्भात तपास करताना असे निदर्शनास आले की कॅफेमध्ये असा प्रकार चालतो. त्यामुळे कॅफे मालकाला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. तर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुलाला आणि त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली.’

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना


dainik maval jahirat

Previous Post

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

Next Post

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.