मावळ तालुका ( Maval Taluka) हा भाताचे आगार असलेला तालुका. यासह सभोवतालच्या अनेक तालुक्यांत देखील भात पिकाचे ( Paddy crop ) उत्पादन घेतले जाते. सध्याचा कालावधी हा भात पिकाच्या वाढीचा कालावधी आहे. याच काळात भात पिकावर अनेक छोटे-मोठे कीटक, अळी किंवा रोग यांचे संकट देखील येत असते. अशावेळी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. प्राप्त माहितीनुसार सध्या तालुक्यातील काही भागांत भात पिकांवर ‘ पाने गुंडळणारी हिरवी अळी ‘ दिसून आली आहे. यादृष्टीने कृषि विभागाने शेतकऱ्यांना सावध केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पाने गुंडळणारी हिरवी अळी ( Worm Pest Crisis ) ही भात पिकावर आढळल्यास शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण औषण फवारणीतून या अळीचा समूळ नायनाट करता येऊ शकतो. ‘सध्या पवनमावळ भागातील काही ठिकाणी भातावर पाने गुंडळणारी हिरवी अळी दिसून आली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी भातपिकाची पाहणी करावी. शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी पाहणी करावी. पाने गुंडळणारी अळी आढळून आल्यास तात्काळ औषध फवारणी करावी. इमिडाक्लोप्रीड Emidacloprid हे औषध 3 ml प्रती 10 लिटर पाणी मिक्स करून फवारावे’, अशी माहिती कृषी सहाय्यक विकास गोसावी यांनी दिली. ( Maval Taluka Rice Paddy crop Worm Pest Crisis )
अधिक वाचा –
Video : मावळमधील बेलज येथे क्रांतिवीर नाग्या कातकरी यांचा स्मृतीदिन साजरा, वाचा क्रांतिकारकाविषयी
PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022