लहान मुले-मुली यांचे अपहण करणे किंवा त्यांना पळवून नेणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या हल्ली वाढताना दिसत आहे. पुणे ( Pune ) आणि परिसरात अशी कोणतीही टोळी ( Kidnapping Gang ) कार्यरत नाही, नागरिकांनी घाबरू नये किंवा अफवा पसरवू नये, अशी माहिती पुणे पोलिसांनी ( Pune Police ) दिली आहे. परंतू, लोणावळा ( Lonavla ) शहराजवळील खंडाळा ( Khandala ) येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेने पुन्हा एकदा नागरिकांच्या चिंतेत आणि भितीत भर पडली आहे. ( Child Abducted From Khandala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरुन खंडाळा येथून यश परशुराम पवार (वय 15 वर्षे) या मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी मुलाचे वडील परशुराम जगन पवार (वय 37 वर्षे, व्यवसाय रिक्षा ड्रायव्हर, रा. नेताजीवाडी, खंडाळा) यांनी लोणावळा शहर पोलिसांत ( Lonavala city Police ) फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 363 अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ( 15 Year Child Abducted From Khandala Lonavala city )
रविवारी मुलगा यश परषुराम पवार वय 15 वर्षे यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फुस लावुन पळवुन नेले, अशी तक्रार वडिलांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास लोणावळा शहर पोलिस पोसई मुजावर साहेब हे करत आहेत.
अधिक वाचा –
सेवा पंधरवडा: लोणावळा शहर पोलिस स्टेशनकडून ‘तक्रार निवारण दिनाचे’ आयोजन, तब्बल ‘इतक्या’ अर्जांचे निवारण
शाळा परिसरातील गुन्हेगारीला बसणार चाप; नागरिकांच्या मागणीनुसार लोणावळा पोलिसांनी उचलले मोठे पाऊल