जुण्या मुंबई-पुणे महामार्गावर ( Old Mumbai Pune Highway ) पोएंजे गावानजीक टँकरचा अपघात ( Tanker Accident ) झाला. यात घटनास्थळी एकाचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टँकर अपघातानंतर बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि सदर अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात आला. ( Tanker Accident On Old Mumbai Pune Highway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अपघातात टँकरखाली एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला, ज्यास उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पनवेल येथे नेण्यात आले. प्रथमदर्शनी तो दगावला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरीही त्यास अद्याप मृत घोषित करण्यात आलेले नाही. तसेच त्याचे नाव देखील समजले नसून वाहतूक पोलिस त्याच्याशी संबंधित कागदपत्रे मिळतात का याचा तपास करत आहेत. ( Tanker Accident On Old Mumbai Pune Highway One Died )
अधिक वाचा –
मोठी बातमी! मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरची वाहनाला धडक
Video : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, एक-दोन-तीन-चार…सलग नऊ गाड्या एकमेकांवर आदळल्या
Video : लोणावळ्यात ब्लेडने बॅग फाडून दीड लाख लंपास, 2 महिलांची हातचलाखी CCTV कॅमेरात कैद