व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 19, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवित्र देहू नगरीच्या विकासासाठी राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत देहूच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना दिली आहे. संत तुकाराम महाराज जन्मस्थान जतन, संवर्धन आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास तब्बल ४१ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, देवस्थान विश्वस्त आणि प्रशासनातील मान्यवर उपस्थित असलेल्या या बैठकीत देहू नगरीच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

देहू नगरीचा जागतिक स्तरावर विकास व्हावा, संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीचे जतन करत भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि देहूचे आध्यात्मिक वैभव अधिक वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शेळके यांनी देहूच्या विकासासंदर्भातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडत अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी ठाम पाठपुरावा केला. देहू-येलवाडी रस्त्याचे काम तातडीने सुरू करणे, आषाढी वारीपूर्वी पालखी मार्गाची दुरुस्ती, शहरातील पाणीपुरवठा योजना, नवीन विद्युत उपकेंद्र, यात्रा अनुदान तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक चित्रण यंत्रणा उभारणे या मागण्या त्यांनी बैठकीत ठामपणे मांडल्या. त्यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.

विकास आराखड्यात संत तुकाराम महाराज जन्मस्थान वाड्याची पुनर्बांधणी, नवीन वास्तू उभारणी, परिसर सुशोभीकरण, प्रकाश व्यवस्था, बागबगिचे, जलविहार सुविधा तसेच भाविकांसाठी अत्याधुनिक सोयी उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर देहूतील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पोलीस ठाणे उभारण्याचा निर्णयही सकारात्मक ठरला आहे.

देहूच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुनील शेळके हे विकासकामांबाबत नेहमीच आक्रमक आणि तत्पर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे देहूच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीचे वैभव अधिक भव्य करण्यासाठी शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्रितपणे कार्यरत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अनुषंगाने वडगाव मावळ येथे प्रशिक्षण शिबिर संपन्न
– मावळमधील महत्वाच्या विकासकामांबाबत आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून पीएमआरडीए कार्यालयात विशेष बैठक संपन्न
– पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती ; जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४७२ कोटींची तरतूद, गतवर्षीपेक्षा ९३ कोटींची वाढ
– पालकांनो, पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी वाचा ! पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ४५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर


dainik maval jahirat

Previous Post

संत तुकाराम साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू

Next Post

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Development of Kondeshwar pilgrimage site to gain momentum MLA Sunil Shelke conducts an on-site inspection

कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी

August 19, 2026
Clarify timeline for Pune-Lonavala third fourth railway lines MP Shrirang Barne directs railway administration

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा ; शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे प्रशासनाला सूचना

August 19, 2026
Talegaon Dabhade Momentum gathers for development of Baneshwar Crematorium through MLA Sunil Shelke

तळेगाव दाभाडे : बनेश्वर स्मशानभूमीच्या विकासाला गती ; नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमदार सुनील शेळके यांचे प्राधान्य

August 19, 2026
Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.