Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती मावळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद – संकल्प – परिवर्तन’ या उद्देशाने संपूर्ण पुणे जिल्ह्यात सध्या “अजित जनसंवाद विकास अभियान” राबविले जात आहे. मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट आहे. या पाचही गटात हे अभियान राबविले जात असून आतापर्यंत चार जिल्हा परिषद गटात हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे. या संपूर्ण अभियानाला मावळ तालुक्यातील महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय आणि समस्यांची जागेवर सोडवणूक होत असल्याने अभियान यशस्वी होताना दिसत आहे.
पाणी, स्वच्छता, आरोग्य आदी रोजच्या जगण्यातील विषय या विशेष संवाद अभियानात चर्चेला येत असून प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याने लोकप्रतिनिधींनाही योग्य तो निर्णय तत्काळ घेता येत असल्याने हे अभियान यशस्वी होताना दिसत आहे. नुकतेच (दि. 25 नोव्हेंबर 2026) मावळ तालुक्यातील इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटात माळवाडी येथे अजित जनसंवाद अभियान राबविण्यात आले.
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सभापती जितेंद्र बडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. या जिल्हा परिषद गटातील विविध गावातील आजी-माजी सरपंच, ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. स्थानिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करत त्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय जागेवरच घेण्यात आला, त्यामुळे नागरिकांकडून अभियानाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल शिंदे, मावळ तालुक्याचे पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुवर्णा राऊत, इतर मान्यवर आणि स्थानिक जिल्हा परिषद गटाच्या सदस्या पल्लवी दाभाडे, इंदुरी पंचायत समिती गणाचे सदस्य दिलीप ढोरे, वराळे पंचायत समिती गणाचे सदस्य राजेंद्र कडलक आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित जनसंवाद विकास अभियान हा प्रशासन आणि नागरिक यांच्यात दुवा साधण्याचे काम करत असल्याने, याप्रसंगी पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी व बीडीओ सेवक थोरात उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांच्या अनेक प्रश्नांवर सोडवणूक करणे पदाधिकाऱ्यांना शक्य झाले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’
