व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, November 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ; शेततळ्याच्या आकारमानानुसार ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 26, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
4726 farmers in Pune district selected for farm ponds 91 farmers in Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्ह्यात संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करून शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकासाठी जिल्ह्यात आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व ४ हजार ७२६ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलवरील सोडतीद्वारे ही निवड झाली असून, शेततळ्याच्या आकारमानानुसार लाभार्थ्यांना कमाल ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी आयुक्तालयाने १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार अर्जदार शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे. या प्रणालीद्वारे सातबारा, आठ-अ, आधार क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी अधिक सुलभ होणार आहे.

तालुकानिहाय निवड झालेल्या लाभार्थ्यांमध्ये आंबेगाव ३४७, बारामती ५१८, भोर १३१, दौंड ३८५, हवेली ७३, इंदापूर ८७४, जुन्नर ४६५, खेड ३३६, मावळ ९१, पुणे शहर ८०, मुळशी १, पुरंदर ८२९, शिरूर ५४५ आणि वेल्हे ५१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपली ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रीतील नोंदणी तपासून घ्यावी. तसेच, योजनेअंतर्गत आवश्यक छाननी पूर्ण होऊन पूर्वसंमती मिळाल्यानंतरच शेततळ्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. पूर्वसंमतीपूर्वी काम सुरू करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– पुणे ग्रँड टूरसाठी ४१८ किमी रस्त्यांची कामे ; सहा टप्प्यांपैकी पाच टप्प्यांतील रुंदीकरण, दुरुस्ती व मजबुतीकरण सुरू
– पुणे जिल्ह्यात १९ हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारी बियाणे, तर ६ हजार एकर क्षेत्रासाठी मोफत हरभरा बियाणाचा कृषी विभागाकडून पुरवठा
– राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ ; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
– ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी सहा तालुक्यांचा समावेश ; राज्यातील दुष्काळ घोषित तालुक्यांची संख्या ‘३१०’


dainik maval jahirat

Previous Post

मावळमध्ये अजित जनसंवाद विकास अभियानाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

संविधान दिनानिमित्त गुरुवारी किल्ले लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान ; राज्यघटनेच्या उद्देशिकेचे होणार सामूहिक वाचन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lohagad-Fort

संविधान दिनानिमित्त गुरुवारी किल्ले लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान ; राज्यघटनेच्या उद्देशिकेचे होणार सामूहिक वाचन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lohagad-Fort

संविधान दिनानिमित्त गुरुवारी किल्ले लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान ; राज्यघटनेच्या उद्देशिकेचे होणार सामूहिक वाचन

November 26, 2026
4726 farmers in Pune district selected for farm ponds 91 farmers in Maval taluka

पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवड ; मावळ तालुक्यातील ९१ शेतकऱ्यांना मिळणार शेततळे

November 26, 2026
Overwhelming response from women to Ajit Jansamvad Vikas Abhiyan in Maval taluka

मावळमध्ये अजित जनसंवाद विकास अभियानाला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 26, 2026
meeting regarding rehabilitation of Pavana Dam affected farmers closed pipeline project

पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि बंदिस्त जलवाहिनी याबाबत २६ नोव्हेंबरला मंत्रालयात पुन्हा बैठक ; रविंद्र भेगडे यांची माहिती

November 25, 2026
fund sanctioned for setting up new bus stop in Maval taluka MLA Sunil Shelke expresses gratitude

मावळ तालुक्यात अत्याधुनिक बस थांबे उभारण्यासाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांनी मानले राज्य सरकारचे आभार

November 25, 2026
Villagers of Shirde Jambhavli maval rise up against Tata company chants of Tata go back

टाटा कंपनीविरोधात शिरदे-जांभवली ग्रामस्थांचा एल्गार! ‘टाटा गो बॅक’च्या घोषणांनी परिसर दणाणला

November 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.