मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या मुंबई-पुणे महामार्गावर गुरुवारी (8 सप्टेंबर) पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. गुरुवारी रोजी दुपारी 3.45 च्या सुमारास पुणे – मुंबई एक्सप्रेस हायवेवर किलोमीटर 39.800 येथे हा भीषण अपघात झाला, ज्यात एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला.
कंटेनर ( क्रमांक – MH43Y5841 ) आणि एर्टिगा ( क्रमांक – MH43BU2145 ) यांत झालेल्या अपघातात, परशुराम कुंडलिक आंधळे (वय 24 रा. लिंबोडीकर ता. आष्टी, जि. बीड) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना तीव्र उतारावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि कंटेनर समोरील एर्टिगा वाहनाला पाठीमागून धडकला. यात कंटेनर रस्त्याच्या बाजूला उलटल्याने कंटेनर चालकाने गाडीतून बाहेर उडी मारली. परंतू, दुर्दैवाने तो त्याच गाडीखाली आला आणि त्यामुळे जागेवरच मृत पावला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य ॲम्बुलनस यावेळी मदतीसाठी दाखल झाले. बोरघाट वाहतूक पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होते. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. ( Big Accident On Mumbai Pune Expressway Involving Container And Ertiga Car One Died )
अधिक वाचा –
वडिलांच्या त्रासाला कंटाळून घरातून पळालेल्या कुसगावमधल्या दोघी बहिणी ‘इथे’ सापडल्या
बाबो..! मुलीच्या कानात गेला साप, काढताना डॉक्टरला फुटला घाम; बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ