साप हा शब्दही उच्चारला तरी अनेकांच्या अंगावर काटा उमटतो. अनेकांना तर साप चावल्याची किंवा सापाला साधा स्पर्श झाल्याचीही अशी भीती बसते की नंतर सापाचे चित्र पाहिले तरीही घाम फुटतो. मात्र, जर कुणाच्या कानातच साप गेला असेल किंवा अडकून पडला असले तर काय करावं बरं..? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही किंवा हे वाचतानाही अंगावर काटा येईल पण ही सत्य घटना आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यात एक डॉक्टर मुलीच्या कानात अडकलेला साप काढण्याचा प्रयत्न करतावा दिसत आहे. हा व्हिडिओ सोशलवर शेअर करण्यात आला आहे, कारण यामुळे इतरांनीही सतर्क व्हावं. ( Snakes And Girl Viral Video )
पण कानात साप शिरलाच कसा?
मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी घरात निवांत झोपली होती. त्यावेळी तिला आपल्या कानात काहीतरी शिरल्याचे जाणवले आणि कानाला भयंकर त्रास होऊ लागला. त्यानंतर तिने त्वरित दवाखाना गाठला. जेव्हा डॉक्टरांनी तरुणीच्या कानाची तपासणी केली तेव्हा त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण या तरुणीच्या कानात साप गेला असल्याचे डॉक्टरांना दिसले.
View this post on Instagram
डॉक्टरांनी त्यानंतर मोठ्या कुशलतेने सापाला मुलीच्या कानातून बाहेर काढले. ही घटना नक्की कुठली आहे हे समजू शकलेले नाही. मात्र, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ( Watch Viral Video Snakes Enter In Girl Ear )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
एकविरा देवस्थानच्या ऐतिहासिक वस्तू पुरातत्व विभागाकडून देवस्थानकडे सुपूर्द करण्याची मागणी
मोठी बातमी! राज्यातील तब्बल 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर, वाचा संपूर्ण कार्यक्रम