मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेचे शिक्षक गणेश पाटील ( Ganesh Patil ) यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक-शिक्षक-शिक्षकेतर संघ ( Khed Taluka Teachers Union ) यांकडून दरवर्षी देण्यात येणारा जिल्हास्तरीय ( District Level ) गुणवंत शिक्षक पुरस्कार ( Meritorious Teacher Award ) यंदा गणेश पाटील यांना जाहीर करण्यात आला होता. रविवारी (18 सप्टेंबर) एका समारंभात आमदार दिलीप मोहिते पाटील ( MLA Dilip Mohite Patil ) आणि मा शिक्षक आमदार भगवान साळुंखे यांच्या हस्ते गणेश पाटील यांना पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा – श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतनचे आदर्श शिक्षक गणेश पाटील यांच्यावर शिक्षक परिषदेकडून मोठी जबाबदारी!
गणेश पाटील यांना आजवर पंचायत समिती मावळचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, रोटरी क्लब लोणावळा आदी पुरस्कार मिळाले आहेत. तब्बल 23 वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करत असलेल्या गणेश पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका यांच्या कार्यकारिणीत जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन विद्यालयात मागील अनेक वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करत असलेले गणेश पाटील सर हे परिसरात प्रामाणिक आणि प्रयोगशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना चाकोरीबाहेरील जग दाखवणे आणि नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी गणेश पाटील यांना ओळखले जाते. ( MLA Dilip Mohite Patil Conferred District Level Meritorious Teacher Award To Ganesh Patil )
अधिक वाचा –
मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे बंधू सुधाकर शेळकेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, शेळकेंनी आरोप फेटाळले
Video: शिळींब गावातील शिंदेवाडीकडे जाणारा रस्ता वाहून गेला, नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास
लोणावळ्यात शिकवणीवरुन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला! खुन्नसने हल्ला झाल्याचा वडीलांचा आरोप