लोणावळा शहरातील न्यु तुंगार्ली गोल्ड व्हॅली येथील सेक्टर सी टीटोस द हेल्वीव बंगला येथे चोरी ( Theft In Lonavala City ) झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने अनेक महागड्या वस्तूंसह रोख रक्कम आणि चोरी करताना काही खासगी कागदपत्रे देखील चोरी केल्याचे उघड झाले आहेत. याप्रकरणी सरवम सौरभ बन्सल (वय 34 वर्षे, व्यवसाय – मार्केटींग, रा. मिलिटरी रोड मरोळ, अंधेरी-मुंबई) याने लोणावळा पोलिस ( Lonavla Police ) स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( Theft In Lonavala City Case Registered )
हेही वाचा – Video : लोणावळ्यात ब्लेडने बॅग फाडून दीड लाख लंपास, 2 महिलांची हातचलाखी CCTV कॅमेरात कैद
प्राप्त माहितीनुसार, दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी रात्री सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान मौजे लोणावळातील न्यु तुंगार्ली गोल्ड व्हॅली येथील सेक्टर सी टीटोस द हेल्वीव बंगला येथे ही चोरी झाली. यात फिर्यादी सरवम सौरभ बन्सल याने तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे; लॅपटॉप – किंमत 40,000 रुपये, मनगटी घड्याळ – किंमत 5,000 रुपये, रोख रक्कम – 20,000 रुपये, हेडफोन – किंमत 10,000 रुपये, यासह तक्रारदार आणि त्याची पत्नी असे दोघांचे ड्रायव्हींग लायसन्स चोरीला गेले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यासह फिर्यादीचे मित्र नेष्टर फेरो याचे 10,000 रुपये किमतीचे मनगटी घड्याळ, मित्र विवेक चतुर्वेदी याचे 5,000 रुपये किमतीचे एअरपॉड यासह पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, तसेच मित्र सेबीन सिमॉन याचे 2000 रुपये किमतीचे हेडफोन आणि आधारकार्ड असा सर्व एकूण रुपये 92,000 मुद्देमाल चोरीला ( 92 Thousand Worth Of Goods Stolen ) गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार उंडे हे करत आहेत. ( Theft In Lonavala City 92 Thousand Worth Of Goods Stolen Case Registered )
अधिक वाचा –
Video : मोठी बातमी! जुण्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, एकजण दगावल्याची भीती
कामशेतमध्ये मोठी चोरी, चोरट्यांनी थेट गोदाम फोडले, लाखोंचा मुद्देमाल लंपास