लोणावळा शहर ( Lonavla City ) आणि परिसरात होणारे गुन्हे काही कमी होताना दिसत नाही. अशात आता आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळा येथील कुरवंडे ( Kurwande ) रस्त्यावर शिकवणीवरून घरी परतत असलेल्या एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला ( Deadly Attack On Student ) झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोराने अंधाराचा फायदा घेत हा जीवघेणा हल्ला केला आणि पळून गेला. मात्र, हल्ला झालेल्या मुलाच्या वडिलांनी ठराविक व्यक्तीचे नाव घेत खुन्नस मनात धरुन हा हल्ला केला असल्याची शंका तक्रारीत नमुद केली आहे.
मयुर तानाजी फाटक (वय 15, राहणार कुरवंडे, लोणावळा) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्यावर सध्या पुण्याजवळील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तीन महिन्यापुर्वी तानाजी फाटक यांच्या मुलास काही युवक विनाकारण त्रास देत होते. त्याबाबत त्यांनी त्रास देणाऱ्या युवकांना भेटून समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर युवकांनी फाटक यांना फटकारत मारण्याची धमकी दिली आणि मुलांनाही पुन्हा त्रास देण्याची धमकी दिली होती, असे पोलिसांकडे तानाजी फाटक यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद आहे. ( Complaint Lodged In Lonavala City Police )
हेही वाचा – लोणावळ्यात व्हीपीएस हायस्कूलच्या पोरांचा जोरदार राडा, पाहा तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ
मंगळवारी तानाजी फाटक यांचा मुलगा मयुर हा सायंकाळी शिकवणीवरून घरी येत असताना काही अज्ञातांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यावेळी तिथे असलेल्या ओळखीच्या एका विद्यार्थीनीने सदर घटनेची मयुरच्या वडीलांना कल्पना दिली. जेव्हा मयूरचे आई-वडील तिथे पोहोचले तेव्हा मयूर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे ( Ashok Kute ) यांनी कुटुंबीयांना धीर दिला, त्यामुळे घटनेच्या दोन दिवसांनंतर मयूरच्या वडीलांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. लोणावळा शहरचे पोलीस ( Lonavla City Police ) निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा आता तपास सुरु आहे. ( Deadly Attack On Student With Murder In Mind Kurwande Lonavala City Police )
अधिक वाचा –
मोठी बातमी! मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरची वाहनाला धडक
संतांच्या शिकवणीचा विसर, भटक्या श्वानाला मरेपर्यंत मारहाण, लोणावळ्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
लोणावळा गणेश विसर्जन मिरवणूक : गणेशभक्तांसोबत आमदार शेळकेंनी धरला ठेका, जल्लोषाचा Video व्हायरल