व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून इंद्रायणी भाताचे बियाणे व खतांचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सहकार कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 9, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले सहकार कृषी सेवा केंद्र भविष्यात संपूर्ण तालुक्याला खते व बियाणांचा पुरवठा करेल असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून इंद्रायणी भाताचे बियाणे व खतांचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सहकार कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार शेळके यांच्या हस्ते व जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जेष्ठ नेते गणेशआप्पा ढोरे, दिपक हुलावळे, जिल्हापरिषद सदस्य संतोष राऊत, अनंता पावशे, भरत मोरे, पंचायत समिती सदस्य रेश्मा देवकर, आशा मोरमारे, काळूराम मालपोटे, गणपत भानुसघरे, तानाजी पडवळ, सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट, कृषी अधिकारी मारुती साळे, खरेदी विक्री संघाचे सभापती किरण हुलावळे, उपसभापती सुनिता केदारी आदी उपस्थित होते.

आमदार शेळके म्हणाले, शेतकरी समृद्ध झाला तरच आपला मावळ आणि महाराष्ट्र समृद्ध होईल, या भावनेतून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हा कौतुकास्पद उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संघाच्या माध्यमातून शेतकरी भवन उभारण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

माऊली दाभाडे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून संघाच्या माध्यमातून शेतकरी हिताचे उपक्रम राबविले पाहिजे, संघाच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिले.

यावेळी संचालक भरत येवले, एकनाथ येवले, माणिक गाडे, शिवाजी असवले, शहाजी कडु, प्रमोद दळवी, गणेश विनोदे, ज्ञानेश्वर निंबळे, रूपेश घोजगे, रमेश भुरूक, विष्णू घरदाळे, मधुकर जगताप, बाजीराव वाजे, शरद नखाते, आशा खांडभोर, मनिषा आंबेकर, अमोल भोईरकर, विष्णू मुऱ्हे, विठ्ठल घारे, सचिव किरण लोहर यांच्या सह संस्थेचे सभासत व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सुनिता केदारी यांनी स्वागत तर किरण हुलावळे यांनी प्रास्ताविक व राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल केदारी यांनी सूत्रसंचालन केले, माणिक गाडे यांनी आभार मानले.

३५ वर्षांनी खरेदी विक्री संघ पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत !
दरम्यान, खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून बियाणे, खते, साखर पुरवठा होत होता, परंतु सन १९९१ पासून सर्व व्यवहार बंद होते. मागील पंचवार्षिक काळातील संचालक मंडळाने गाळे बांधून संघाला उत्पन्न सुरू केले होते तर आताच्या संचालक मंडळाने ३५ वर्षानंतर पुन्हा बियाणे व खतांचा पुरवठा सुरू करून संघ शेतकऱ्यांच्या सेवेत आणला आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम
– खासदार श्रीरंग बारणे : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती
– आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान
– तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

Next Post

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.