व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

अनेक वर्षांपासून रखडलेले भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 9, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहूरोड निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय व देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर झाले आहेत. या भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यास सदन कमांड ब्रिगेडियर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

देहूरोड येथील सदन कमांड येथे एनचआय एमएसआरडीसी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड , देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी प्रतिनिधी आणि ब्रिगेडर यांच्या प्रमुख आधिकारी व संबंधित विभागाचे प्रमुख यांच्या बरोबर विविध प्रश्नांसंदर्भात खासदार बारणे यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. सदन कमांड ब्रिगेडियर आशिष कटोज, कर्नल अमित श्रीवास्तव, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत यादव, एमएसआरडीसीचे उपअभियंता विकास पिंपळकर, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य कैलास पानसरे, शिवसेना देहूगाव शहर प्रमुख सुनिल हगवणे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष राजेंद्र तरस, ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड एम्प्लॉय युनियन अध्यक्ष मोहन घुले उपस्थित होते. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील प्रलंबित प्रश्न, चालू असलेली कामे याचा आढावा घेण्यात आला.

खासदार बारणे म्हणाले, देहूरोड निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय व देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग मंजूर झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एमएसआरडीसीकडून भुयारी मार्गाला मान्यता मिळाली आहे. या भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्याला सदन कमांड ब्रिगेडियर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने तत्वतः मान्यता दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले काम सुरू होईल. काळोखे मळा ते हगवणे वस्तीदरम्यानचा रस्ता संरक्षण विभागाच्या जागेतून जातो. रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यात येणार आहेत.

श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पुढील महिन्यात पंढरपूरला जाणार आहे. पालखी मार्ग संरक्षण विभागाच्या जागेतून जातो. या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याला ब्रिगेडियर यांनी मान्यता दिली आहे. किवळे येथील महावितरणची लाईन संरक्षण विभागातून जात आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम
– खासदार श्रीरंग बारणे : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती
– आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान
– तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


Previous Post

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

Next Post

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; 'संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल' - आमदार सुनील शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
Industrial belt in Maval area will get big boost Planning to build new railway freight yard in Talegaon area

मावळ भागातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

June 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.