व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

वडगाव शहरातील काही प्रभागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 9, 2026
in लोकल, शहर
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव शहरातील काही प्रभागांमध्ये अनियमित पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत विरोधकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी (दि. 8 जून) बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, नगरसेवक विशाल वहिले, सारिका चव्हाण यांनी प्रामुख्याने त्यांच्या प्रभाग क्रमांक ६, ९ आणि १७ मध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असल्याबाबत तक्रार करत प्रत्येक घरापर्यंत नियमित पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा करावा, त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

यावेळी विरोधक आणि सत्ताधारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्यात पाणीपुरवठ्याच्या मुद्दयावरून आरोप-प्रत्यारोप झाले. नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्याधिकारी प्रवीण निकम आणि उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती सुनील ढोरे यांनी गंभीर पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक अजय म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, अतुल राऊत, शिवाजी घारे, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

नवीन पाणीपुरवठा योजनेचे सुरू असलेले काम तसेच अनियमित विद्युतपुरवठा यामुळे पाणीपुरवठा नियमितपणे करण्यास काही अडचणी निर्माण होतात. ज्या भागात पाणीटंचाई भासेल त्या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जाईल. – डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी

आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या नवीन जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ती योजना पूर्ण झाल्यावर संपूर्ण शहराला सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. – सुनील ढोरे, उपनगराध्यक्ष

शहराच्या सर्व प्रभागांमध्ये स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा ही नगरपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने नगरपंचायत प्रशासनाने पाणीटंचाई टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्या त्या वेळी करणे आवश्यक आहे. – अर्चना म्हाळसकर, विरोधी पक्षनेत्या

जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. वडगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. – विशाल वहिले, नगरसेवक

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम
– खासदार श्रीरंग बारणे : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती
– आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान
– तळेगाव दाभाडे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.