कामशेत शहरातून चोरीची घटना ( Theft In Kamshet ) समोर येत आहे. कामशेतमधील श्री साई एजन्सी यांच्या गोदामातून चोरट्यांनी थेट किराना साहित्य चोरी ( Thieves Stole Groceries ) करुन नेल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवार (दिनांक 15 सप्टेंबर) सायंकाळी 5 ते शुक्रवार (दिनांक 16 सप्टेंबर) सकाळी 9 दरम्यान ही घटना घडली आहे. विशाल गोपाळ भानुसघरे (वय 30 रा. शिलाटणे, मावळ) यांनी याबाबत कामशेत पोलीस ( Kamshet Police ) ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, भानुसरे यांचे कामशेत येथे किराणा सामानाचे गोदाम आहे. चोरट्यांनी वर नमुद केलेल्या कालावधीत गोदामाच्या मागच्या भिंतीच्या खिडक्यांच्या ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तेथील तांदाळाचे 25 बॉक्स, तेलाचे 80 ते 85 बॉक्स आणि रोख रक्कम 8 हजार 700 रुपये असा एकूण 2 लाख 67 हजार 808 रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास आता कामशेत पोलीस करत आहेत. ( Theft In Kamshet City Thieves Stole Groceries And Money From Godown )
अधिक वाचा –
Video : लोणावळ्यात ब्लेडने बॅग फाडून दीड लाख लंपास, 2 महिलांची हातचलाखी CCTV कॅमेरात कैद
भाजपाच्या लढ्याला यश, अखेर कामशेतमधल्या ‘त्या’ डॉक्टरची बदली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामशेत शहर येथे मिठाई वाटप