लोणावळा शहरातील ( Lonavla City ) व्हीपीएस विद्यालय ( VPS School ) या नामांकीत विद्यालयाबाहेर झालेल्या विद्यार्थ्यांच्या मारामारी आणि वादावादीच्या गंभीर प्रकारामुळे पालकांसह नागरिकांकडून आणि विविध राजकीय पक्षांकडून पोलिसांनी शालेय परिसरात गस्त ( Special Teams To Patrol Area Of VPS Vidyalaya ) घालण्याची मागणी करण्यात आली होती.
हेही वाचा – लोणावळ्यात व्हीपीएस हायस्कूलच्या पोरांचा जोरदार राडा, पाहा तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ
व्हीपीएस विद्यालयाबाहेर ( VPS Vidyalaya ) काही दिवसांपूर्वी मुलांच्या टोळक्यांत एकमेकांना गलिच्छ शिव्या देत हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शालेय परिसरात घडलेल्या या निंदनीय प्रकारामुळे शाळेची आणि शहराची बदनामी होत असून पोलिसांनी यात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली होती.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार लोणावळा पोलिसांनी ( Lonavala City Police ) बुधवार (21 सप्टेंबर) पासून व्हीपीएस विद्यालयाच्या आवारात गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. पोलिस कर्मचारी शालेय आवारात पेट्रोलिंग करत असून पोलिस प्रशासनाने तत्काळ पाऊल उचलल्याबद्दल नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहे. लोणावळा शहर पोलीस स्टेशनमार्फत आता शालेय भागात दररोज भरारी पथक ( Special Teams To Patrol ) गस्त घालणार आहे. ( Lonavala City Police Appoint Special Teams To Patrol Area Of VPS Vidyalaya Lonavala )
अधिक वाचा –
लोणावळा येथे मोठी चोरी; चोरट्याकडून महागड्या वस्तूंसह रोख रक्कम लंपास, गुन्हा दाखल
Video : लोणावळ्यात ब्लेडने बॅग फाडून दीड लाख लंपास, 2 महिलांची हातचलाखी CCTV कॅमेरात कैद
लोणावळ्यात व्हीपीएस हायस्कूलच्या पोरांचा जोरदार राडा, पाहा तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ