देशातील अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील लम्फी स्कीन ( Lumpy Skin Disease ) या चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्र राज्य देखील लम्फी स्कीन बाबत नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. लम्फी स्कीन हा आजार गोवंशीय पशूधनात आढळून येत आहे. लम्फीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता शासन स्तरावरुन अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. ( Maval Tehsildar Order To All Village )
बैल पोळा ( Bail Pola ) हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अनेक ठिकाणी या सणाच्या दिवशी बैलांना सजवून एकत्र आणले जाते, त्यांची मिरवणूक काढले जाते. तसेच बैल घाटात बैल एकत्र आणले जातात. लम्फी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर बैल पोळा सणाच्या दिवशी सदर चर्मरोगाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत, त्यामुळे बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना एकत्र आणून मिरवणूक काढण्यास बंदी ( Prohibition Of Bull Pola Procession ) घालण्यात आली आहे. तसे पत्रक जारी करण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तहसीलदार कार्यालय मावळ तालुका येथून तालुक्यातील सर्व गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांच्या नावे हे पत्रक पाठवण्यात आले असून, शासन निर्णयाप्रमाणे गावोगावी दवंडीद्वारे, फ्लेक्सवर लिहून अथवा नोटीस बोर्डवर माहिती देत नागरिकांना या निर्णयाची माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ( Lumpy Skin Disease Prohibition Of Bull Bail Pola Procession Tehsildar Maval Order To All Village )
अधिक वाचा –
लम्फीचा प्रादुर्भाव; आमदार सुनिल शेळकेंचे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
लम्फी आजाराचा प्रादुर्भाव : कार्ला येथे 130 पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण