व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

सदर बैठकीत मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांचा विकास आणि रस्ते सुधारणेबाबत अत्यंत ठोस निर्णय घेण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 24, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानभवन पुणे येथे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीए (PMRDA) आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी तसेच संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी (दि. २२) पार पडली.

सदर बैठकीत मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांचा विकास आणि रस्ते सुधारणेबाबत अत्यंत ठोस निर्णय घेण्यात आले. या बैठकीत टायगर व लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन १० महिने उलटले तरी कामात गती नसल्याबद्दल आमदार शेळके यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली; तसेच हा रस्ता १५ मीटर रुंदीचा नियोजित असला आणि काही भागात भूसंपादन करावे लागणार असले, तरी कामात अधिक विलंब होऊ नये म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या १० मीटर रुंदीच्या रस्त्याचे सुधारणा व सुशोभीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

या सोबतच लोणावळा नगरपरिषद हद्दीतील रस्त्याची शासकीय मोजणी सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी करून हे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. लोणावळा जवळील प्रस्तावित ‘स्काय वॉक’ प्रकल्पासाठी पवना धरणातून वनविभागाच्या हद्दीतून १० किलोमीटर अंतराची पाण्याची लाईन टाकणे आवश्यक असल्याने, त्यासाठी वनविभागाच्या परवानगीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

आगामी आषाढी एकादशी आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पावित्र्य व महत्त्व लक्षात घेऊन देहू-येलवाडी रस्त्याच्या कामावरही सविस्तर चर्चा करण्यात आली असून, वारकरी बांधवांना व प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालखीच्या अनुषंगाने हे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाला सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसह संबंधित सर्व विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे


dainik maval jahirat

Previous Post

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Next Post

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Forced sale of non-subsidized fertilizers along with subsidized fertilizers stopped Agriculture Minister Dattatreya Bharane

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
Bala-Bhegade-And-Sunil-Shelke

मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.