मावळ विधानसभेचे ( Maval Vidhansabha ) आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी बुधवारी राज्याचे नवनियुक्त ग्रामविकास मंत्री ( Rural Development Minister ) गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांची भेट घेतली. मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात आणि विकासकामांच्या निधीबाबत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे रस्त्यांची प्रचंड दुरावस्था होत आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूरी मिळालेल्या विकासकामांवर स्थगिती असल्याने अनेक भागातील कामे रखडलेली आहे. या सर्व प्रश्नांसंदर्भात आमदार शेळके यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची बुधवारी मंत्रालयात भेट घेतली. ( MLA Sunil Shelke Met Minister Girish Mahajan )
भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे.त्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा,अशी मागणी देखील मा.मंत्री महोदयांकडे केली.#maval #sunilshelke
— Sunil Shelke (@shelkesunilanna) September 21, 2022
ग्रामीण भागातील मंजूर झालेल्या कामांवरील स्थगिती उठवावी. तसेच ज्या भागातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी आग्रही मागणी शेळके यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली. ( MLA Sunil Shelke Met Rural Development Minister Girish Mahajan )
अधिक वाचा –
लम्फीचा प्रादुर्भाव; आमदार सुनिल शेळकेंचे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन
श्री क्षेत्र देहू नगरपंचायतच्या पायाभूत सुविधा आणि विकासकामांचा आमदार सुनिल शेळकेंनी घेतला आढावा