मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी सोमवार (19 सप्टेंबर) रोजी श्री क्षेत्र देहू नगरपंचायत ( Dehu Nagar Panchayat ) येथे विशेष आढावा बैठक घेतली. नगपंचायत अंतर्गत विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधा ( Infrastructure And Development Works Review Meeting ) यांचा आमदार शेळके यांनी आढावा घेतला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.
देहूगाव ( Dehugaon ) येथे झालेल्या या आढावा बैठकीला आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत श्री क्षेत्र देहु नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, नगरपंचायतच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेवक, नगरसेविका आदी प्रमुख जबाबदार व्यक्ती उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री क्षेत्र देहु नगरपंचायत येथे आढावा बैठक आज संपन्न झाली.यावेळी रस्ते,पाणी पुरवठा, स्वच्छता व विविध विकासकामांची सद्यस्थिती याची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी माझ्यासमवेत,नगरपंचायत मुख्याधिकारी श्री.प्रशांत जाधव,नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेवक,नगरसेविका उपस्थित होते.#dehu pic.twitter.com/tNWHpAFbfO
— Sunil Shelke (@shelkesunilanna) September 19, 2022
शहरात रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आदी पायाभूत सुविधांबद्दल नागरिकांच्या तक्रारी असतील तर त्या तक्रारीचे तत्काळ निवारण करण्यात यावे, तसेच या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुचना आमदार शेळके यांनी उपस्थितांना दिल्या. यासह शहरातील विविध विकासकामांचा आमदार महोदय यांनी आढावा घेत लवकरात लवकर विकासकामे पुर्ण करण्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. ( Sri Kshetra Dehu Nagar Panchayat Infrastructure And Development Works Review Meeting Held By MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
भंडारा डोंगरावर उभारले जाणार श्री तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर, संकल्प सभा संपन्न
कोथुर्णेतील निर्भयाचा वाढदिवस; नराधम आरोपीला अजूनही फाशी नाहीच, राजकारण्यांची आश्वासने हवेत