मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण म्हणजे भंडारा डोंगर. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज ( Saint Shree Tukaram Maharaj ) यांच्या पदस्पर्शाने आणि रहिवासाने पुण्यपावन झालेल्या या ठिकाणी राज्यभरातून वारकरी भाविक येत असतात. तसेच, येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वास घेण्यासाठीही दुरवरुन पर्यटक येत असतात.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळेच भंडारा डोंगर ( Bhandara Hill ) (ता. मावळ जि.पुणे ) येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे भव्यमंदिर उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या संदर्भात विशेष संकल्प सभा ( Sankalp Sabha ) शांतीब्रम्ह मारुती बाबा कुऱ्हेकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील ( MP Srinivas Patil ) हे उपस्थित होते. ( Establishment Grand Temple Saint Shree Tukaram Maharaj )
हेही वाचा – कामशेतमध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ विषयावर व्याख्यान आणि स्पर्धा परिक्षेच्या उमेदवारांसाठी मार्गदर्शन सत्र
तसेच, आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) संत श्री तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, उल्हास पवार, एम.आय.टी.चे संस्थापक विश्वनाथ कराड, कमलकिशोर कदम, हनुमंतराव गायकवाड, माजी आमदार दिगंबर भेगडे, कृष्णराव भेगडे, मदन गोसावी यांच्यासह महाराष्ट्रातील संत साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि मावळ तालुक्यातील अध्यात्मिक, सामजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ( Resolution Meeting For Establishment Grand Temple Saint Shree Tukaram Maharaj At Bhandara Hill )
अधिक वाचा –
‘रात्री अपरात्री फोन आला तर नक्की उचला, कदाचित तो फोन मदतीसाठी हाक असेल’
मावळमधील ‘या’ गावात आढळले प्राचीन अवशेष, मानवी शरीराचे भाग आणि बरंच काही…