शिरे-शेटेवाडी ( Shire Shetewadi ) येथील 105 कुटुंबाचा गेली 22 वर्षापासून प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा प्रश्न तत्कालीन आमदार दिगंबर भेगडे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने, तसेच मधुकर धामणकर यांच्या विशेष प्रयत्नाने अखेर मार्गी लागला आहे. या सर्व 105 कुटुंबाचे पुनर्वसन आंबी ( Ambi ) येथे करून प्रत्येक बाधित कुटुंबांना घर बांधण्यासाठी प्लॉटचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिरे शेटेवाडी येथील सर्व बाधित शेतकऱ्यांची तहसील कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. तसेच त्यांना योग्य सूचना देत पुनर्वसन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ( Villagers Of Shire Shetewadi Village Will Be Resettled In Ambi )
यावेळी स्वतः माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपा मावळ तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाब म्हळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, प्रशांत ढोरे, किरण राक्षे, रामदास आलम यांच्यासह शिरे शेटेवाडी येथील शेतकरी बांधव उपस्थित होते. ( Villagers Of Shire Shetewadi Village Maval taluka Will Be Resettled In Ambi )
अधिक वाचा –
आमदार शेळकेंनी या खास कारणासाठी घेतली मंत्री गिरीश महाजन यांची भेट, वाचा सविस्तर
काले-पवनानगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आशा कालेकर बिनविरोध..!