मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) प्रमुख काले-पवनानगर ग्रामपंचायतच्या ( Kale Pavananagar Gram Panchayat ) उपसरपंचपदी ( Deputy Sarpanch ) आशा प्रवीण कालेकर ( Asha Kalekar ) यांची बिनविरोध निवड झाली आहे. काले-पवनानगर ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच अमित कुंभार ( Amit Kumbhar ) यांनी त्यांच्या पदाचा निश्चित कालावधी पुर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी बुधवार (21 सप्टेंबर) रोजी निवडणूक घेण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उपसरपंच पदासाठी यावेळी विहीत वेळेत आशा प्रवीण कालेकर यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच खंडू कालेकर यांनी त्यांच्या नावाची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. ग्रामपंचायत काले-पवनानगरचे सर्व सदस्य, ग्रामसेवक वाडेकर यावेळी उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काले – पवनानगर ग्रामपंचायत :
सरपंच – खंडू कालेकर
उपसरपंच – आशा कालेकर (नवनिर्वाचित)
सदस्य – अमित कुंभार, उत्तम चव्हाण, रमेश कालेकर, प्रवीण घरदाळे, छाया कालेकर, रंजना कालेकर, योगिता मोहोळ, फुलाबाई कालेकर
( Kale Pavananagar Gram Panchayat Asha Kalekar Elected Unopposed Deputy Sarpanch Upsarpanch )
अधिक वाचा –
सोसायटी निवडणूक : वाऊंड सोसायटीवर ‘या’ दोन तज्ज्ञ संचालकांची निवड
विशेष लेख : कॉमेडियन राजू श्रीवास्तव याचे निधन… राजू गेला… पण जाता जाता खुप काही शिकवून गेला!