वीजपुरवठा खंडीत ( Interruption Electricity Supply ) केल्याचा राग मनात धरून थेट महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला ( Assistant Engineer of Mahavitaran ) बेदम मारहाण ( Assaulting ) केल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade ) येथे सोमवार (दिनांक 19 सप्टेंबर) रोजी घडला. याप्रकरणी महावितरण सहाय्यक अभियंता विक्रम गुलाब राठोड (वय 39, रा. ताथवडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात ( Police Station ) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओंकार उर्फ विकी नवघने (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी हे तळेगाव दाभाडे स्टेशन येथील महावितरणच्या शाखा – 1 येथे कार्यरत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपीला महिन्याभरापूर्वी चुकीचे वीजबिल आले होते. त्याला वीजबिल दुरुस्त देखील करून देण्यात आले होते. त्यावेळी त्याने महावितरणच्या कार्यालयात येऊन शिवीगाळ केली होती. दरम्यान फिर्यादी यांनी आरोपीला वीजबिल भरण्याबाबत सांगितले होते. मात्र त्याने वीजबिल भरले नव्हते. त्यामुळे महावितरणने आरोपीचे वीज कनेक्शन कापले. याचाच राग मनात धरून आरोपीने सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयात येऊन सहाय्यक अभियंता राठोड यांना मारहाण केली., असे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमुद आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत. ( Assaulting Assistant Engineer of Mahavitaran Due To Interruption Electricity Supply Case Registered Talegaon Dabhade Police Station )
अधिक वाचा –
तळेगाव नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाची आमदार शेळकेंकडून पाहणी
थेट तोडगा! आमदार शेळकेंचे सहकार्य आणि नगराध्यक्ष ढोरेंचे प्रयत्न, वडगावचा पाणी पुरवठा होणार सुरळीत
श्री क्षेत्र देहू नगरपंचायतच्या पायाभूत सुविधा आणि विकासकामांचा आमदार सुनिल शेळकेंनी घेतला आढावा