जांभूळ धरण ( Jambhul Dam ) परिसरातील सततच्या खंडीत वीजपुरवठ्यामुळे वडगाव शहरातील ( Vadgaon Maval City ) काही भागांत होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होत होता. या त्रासाला वडगावकर नागरिक हैराण झाले होते. वारंवार महावितरण विभागाला पत्रव्यवहार करून देखील काही होत नसल्याने अखेर आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांच्या सहकार्याने वडगाव नगरपंचायत माध्यमातून नगराध्यक्ष मयुर ढोरे ( Mayor Mayur Dhore ) आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांच्या विशेष प्रयत्नांतून जांभूळ धरण परिसरात जनरेटर उपलब्ध ( Water Supply to Vadgaon By Generator ) करून आणण्यात आले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जनरेटर उपलब्ध झाल्याने वडगाव शहरात विस्कळीत झालेला पाणी पुरवठा लवकरच सुरळीत चालू होणार आहे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी व्यक्त केली. ( Tap Water Supply Scheme In Vadgaon Maval City Will Be Powered By Generator )
अधिक वाचा –
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाचा वडगावमध्ये प्रारंभ, रुग्णांना फळे वाटून अभियानाचा शुभारंभ
भाजपकडून ‘टाळाठोक’ आंदोलनाची हाक, वडगाव शहरात होणार आंदोलन