मावळ तहसील ( Maval Tehsil ) कार्यालयाकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ( National Leader to Father of Nation ) सेवा पंधरावडा अंतर्गत महासेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांचा जन्मदिवस ( Birthday ) म्हणजेच 17 सप्टेंबर ते महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) यांची जयंती 2 ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या काळात विविध लोकाभिमुख उपक्रम राबवण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेत. त्यानुसार मावळ तहसील कार्यालयाकडून ( Maval Tehsil Office ) बुधवार (दिनांक 21 सप्टेंबर) रोजी वडगाव मावळ शहरातील भेगडे लॉन्स या ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत महासेवा मेळावा ( Mahaseva Melawa ) याचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा – राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाचा वडगावमध्ये प्रारंभ, रुग्णांना फळे वाटून अभियानाचा शुभारंभ
महासेवा मेळाव्यात मिळाणाऱ्या सुविधा, पाहा यादी…
1. नविन रेशन कार्ड काढणे, रेशनकार्ड विभक्त करणे
2. आधार नोंदणी करणे, आधार कार्ड अदयावत करणे
3. मतदान यादीमध्ये नाव नोंदणी करणे, मतदार यादीतील नावांची दुरुस्ती
4. उत्पन्न दाखले, रहिवास दाखले, जातीचे दाखले वाटप करणे
5. संजय गांधी योजना / श्रावणबाळ योजना लाभार्थी अर्ज भरून घेणे
6. कृषी विभागांकडील विविध योजनांची माहिती देणे
7. पंचायत समितीकडील विविध योजनांची माहिती देणे
8. आरोग्य विभागाकडील विविध योजनांची माहिती देणे
9. कोविड १९ चे लसीकरण
10. जेष्ठ नागरिक पास
11. नगर पालिकेकडील विविध योजनांची माहिती देणे
12. महिला बाल कल्याण विभागाकडील विविध योजनांची माहिती देणे
13. पशुवैदयकीय विभागाकडील विविध योजनांची माहिती देणे
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या महासेवा मेळाव्यात तालुक्यातील तहसील कार्यालयातील सर्व विभागाकडील विविध सेवांचा लाभ देण्यात येणार असून तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे ( Tehsildar Madhusudan Berge ) यांच्या वतीने करण्यात आले आहे. ( Mahaseva Melawa By Maval Tehsil Office Part Of Service Fortnight From National Leader to Father of Nation )
अधिक वाचा –
थेट तोडगा! आमदार शेळकेंचे सहकार्य आणि नगराध्यक्ष ढोरेंचे प्रयत्न, वडगावचा पाणी पुरवठा होणार सुरळीत
रविंद्र भेगडे यांच्या मदतीने औंढे येथील महिला भगिनींना मिळाले रेशनकार्ड