मान्सूनच्या परतीचा प्रवास ( Return Journey Of Monsoon ) आता खऱ्या अर्थाने सुरु झाला असून राजस्थानमधून ( Rajastan ) नैऋत्य मोसमी पाऊस ( Southwest Monsoon ) माघारी फिरण्यास सुरुवात झाल्याचे भारतीय हवामान विभागाने ( Department Of Meteorology ) मंगळवारी (20 सप्टेंबर) रोजी जाहीर केले. तसेच, महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस माघारी फिरेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदा मान्सूनने 29 मे रोजी केरळमधून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर सर्वांत शेवटी 2 जुलै रोजी पश्चिम राजस्थानच्या भागात प्रवेश करून संपूर्ण देश व्यापला होता. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यंदा मान्सूनचा सर्वाधिक लाभ हा मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांना मिळाला. मात्र, उत्तर आणि ईशान्य भारतातील काही भागांना पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्रात यंदा मात्र सर्वच जिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली. देशात यंदा सरासरीच्या तुलनेत 7 टक्के अधिक, तर महाराष्ट्रात 26 टक्के अधिक पावसाची नोंद झालेली आहे.
राजस्थानमधून मान्सूनच्या परतीचा प्रवास हा साधारण 17 सप्टेंबरच्या आसपास असतो. यंदा तो तीन दिवस उशिराने परत फिरताना दिसत आहे. राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रात त्याचा प्रवास 10 ते 15 दिवसांनी होतो. त्यानुसार महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पावसाचा परतीचा प्रवास होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होत असतानाच सध्या बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रामुख्याने विदर्भात काही भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ( The Return Journey Of Monsoon Rains Begins Department Of Meteorology )
अधिक वाचा –
मावळ तहसील कार्यालयाकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ‘महासेवा मेळावा’
थेट तोडगा! आमदार शेळकेंचे सहकार्य आणि नगराध्यक्ष ढोरेंचे प्रयत्न, वडगावचा पाणी पुरवठा होणार सुरळीत