प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव ( Raju Srivastav ) याचे बुधवारी ( 21 सप्टेंबर 2022 ) रोजी रुग्णालयात निधन झाले. पण मरणापूर्वी तब्बल 42 दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी व्यायामादरम्यान आलेला हार्ट अटॅक, त्यानंतर त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सहज चालता बोलता माणूस मृत्यूच्या काळदाढेत पोहोचला. कुणालाही विश्वास बसत नव्हता. अगदी राजूला सुद्धा. आणि म्हणूनच की काय, त्याने त्या काळ दाढेतून बाहेर पडण्यासाठी तब्बल 42 दिवस झुंज दिली. ‘जगण्यासाठी रडायचं नाही तर लढायचं असतं’ या उक्तीप्रमाणे राजू दिवसेंदिवस अगदी प्राणपणाने लढत होता. लढत होता कुटुंबासाठी, चाहत्यांसाठी. त्याचे चाहते, कुटुंब, नातेवाईक सर्वजण त्याच्यासाठी प्रार्थनाही करत होते.
एक दिवस त्याचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढल्याचे समजले आणि लाखो चाहत्यांच्या जीवात जीव आला. पत्नीशी काही शब्द बोलला, हे ऐकूण तर आता आपला राजू पुन्हा आपल्याला हसवायला रंगमंचावर येणार, अशी खात्री झाली. पण… पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.. पुन्हा मागील आठवड्यात परिस्थिती बदलली.
ब्रेन डेड होईपर्यंत परिस्थिती बिघडली. डॉक्टरांचे अपडेट्स, कुटुंबीयांचे अपडेट्स सर्वांनाच चिंतेत टाकणार होते, अखेर बुधवारी सकाळीच ती अप्रिय वार्ता धडकली. सर्वांचा लाडका राजू काळाच्या पडद्याआड गेला. आयुष्यभर संघर्ष, आयुष्याच्या शेवटी संघर्ष, पण गुगल करुन पाहा हो… त्याच्या चेहऱ्यावर हास्याशिवाय काहीच दिसत नाही.
View this post on Instagram
राजूने काय शिकवलं. मरण आहे, ते आज ना उद्या यायचेच पण पाठीमागच्यांना आपल्या आठवणींने नेहमी रडूच का यावे, हसूही आलं पाहिजे. राजू तुला आठवताना, तुझे व्हिडिओ पाहताना सर्वजण हसतील. पण आज तुझ्या असंख्य चाहत्यांच्या डोळ्यात फक्त अश्रूच आहेत. ते पुसायला तरी ये रे…! ( Comedian Raju Shrivastava Dies At 58 )
भावपूर्ण श्रद्धांजली किंग ऑफ कॉमेडी !
अधिक वाचा –
तब्बल 70 वर्षे ब्रिटनच्या महाराणी राहिलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन; जगभरातून श्रद्धांजली
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल; ‘कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो’