व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 11, 2026
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Jail-And-Court

File Image


Dainik Maval News : देहूरोड परिसरातील एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या चार आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल देत ‘दुहेरी जन्मठेपे’ची शिक्षा सुनावली आहे. माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

नेमकी घटना काय होती?
सन २०२१ मध्ये देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपींनी संगनमत करून पीडित मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार केला. इतकेच नव्हे, तर या नराधमांनी अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार आपल्या वासनेची शिकार बनवले. या छळवणुकीत काही आरोपींनी पीडितेचा अनैसर्गिक छळ देखील केला होता.

पीडितेने विरोध केल्यास तिला मारहाण करण्यात येत असे आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली जात असे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३७६ (ड) (सामूहिक बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक छळ) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (Atrocity Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयातील खटला आणि पुरावे
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्यादरम्यान सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पाटील यांनी काम पाहिले. न्यायालयाने या प्रकरणात वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या. भक्कम पुरावे आणि प्रभावी युक्तिवादामुळे आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला.

शिक्षा सुनावण्यात आलेले आरोपी :
१) नोमान ऊर्फ अरबाज जावेद खान
२) सुलतान ऊर्फ मुश्ताख सलिम सय्यद
३) रियाज ऊर्फ मन्नन जोवद खान
४) सोहेल शेरअली पिरझादे
या चौघांनाही न्यायालयाने त्यांच्या कृत्याबद्दल दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पोलीस प्रशासनाचे यश
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. साक्षीदार फितूर होऊ नयेत यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोनि जगन्नाथ जानकर, पोउपनि डी. एस. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत निंबाळे, महिला पोलीस हवालदार आशा घाटे आणि सचिन पतुरे यांनी या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा लागण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता


dainik maval jahirat

Previous Post

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

Next Post

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.