व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी पर्लिमेंट ऑफ इंडिया, राष्ट्र्पती भवन, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तसेच बार कौन्सिल ऑफ इंडिया यांना भेट दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 9, 2026
in लोकल, शहर
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कै. अॅड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने एलएल.बी. विद्यार्थ्यांसाठी दिल्ली येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशातील प्रमुख घटनात्मक संस्थांना भेट देत प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण घेतले.

Novel NIBR Ads

या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी पर्लिमेंट ऑफ इंडिया, राष्ट्र्पती भवन, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तसेच बार कौन्सिल ऑफ इंडिया यांना भेट दिली. प्रत्येक संस्थेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून कार्यपद्धती, घटनात्मक भूमिका आणि न्यायव्यवस्थेतील महत्त्व स्पष्ट केले.

या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना घटनात्मक संस्था, न्यायव्यवस्था आणि कायदे व्यवसायाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवून देणे, तसेच त्यांच्या शैक्षणिक अभ्यासाला व्यवहार्य दिशा देणे हा होता. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकिलांशी तसेच विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत न्यायप्रक्रिया, वकिली व्यवसायातील संधी आणि आव्हाने याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळवली.

महाविद्यालयाचे प्राचार्य कैलाश पौळ यांच्या पुढाकारातून हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला प्रा. लेवी मॉर्निंगस्टार, प्रा. अनुप पाठक, तसेच धनंजय गुट्टे, रोहिणी देशपांडे आणि सागर गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. या संपूर्ण दौऱ्याचे आयोजन संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

तसेच “आजच्या स्पर्धात्मक आणि गतिमान युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे शिक्षण विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवते. संसद, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया यांसारख्या देशाच्या सर्वोच्च संस्थांना दिलेल्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना, न्यायव्यवस्था आणि कायदे व्यवसाय यांचे वास्तव आकलन झाले आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, व्यावसायिक दृष्टीकोन आणि सामाजिक बांधिलकी विकसित होते. संस्थेच्या वतीने भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.”

Novel NIBR Ads

संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे , खजिनदार राजेश म्हस्के व सह सचिव विनायक अभ्यंकर या सर्व सदस्यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– कामशेत पोलिसांची कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
– संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल
– देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
– राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती


dainik maval jahirat

Previous Post

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

Next Post

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : पर्यटननगरी लोणावळा शहरात मुसळधार सरी, २४ तासांत ९४ मि.मी. पावसाची नोंद

June 24, 2026
drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.