व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

किवळे येथे रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 9, 2026
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील मामुर्डी ते वाकड दरम्यान सेवा रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने केले जात आहे. किवळे येथे रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. येत्या १५ दिवसांत सद्यस्थितीतील निकृष्ट काम पूर्णपणे काढून टाकून नव्याने दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी एनएचआयच्या अधिकाऱ्यांना दिले.

महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज) बाह्यवळण मार्गावरील मामुर्डी ते वाकड येथील मुळा नदीवरील पुलापर्यंत दोन्ही बाजूस सेवा रस्त्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. १२ मीटर अंतराने रस्त्याचा विस्तार करण्याचा आराखडा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केला आहे. त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. या कामाची खासदार बारणे यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक निलेश तरस, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, युवासेना मावळ लोकसभा राजेंद्र तरस यांच्यासह महामार्ग विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, किवळे ते वाकड दरम्यान दोन्ही बाजूंनी बारा मीटर सेवा रस्ता विकसित केला जाणार आहे. किवळे येथे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचे काम आढळून आल्याने संबंधित अधिकारी व ठेकेदारांना कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि दैनंदिन वाहतुकीशी संबंधित कामांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. येत्या १५ दिवसांत सद्यस्थितीतील निकृष्ट काम पूर्णपणे काढून टाकून नव्याने दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्याचे सक्त निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या या कामामध्ये गुणवत्ता, टिकाऊपणा आणि नागरिकांच्या सुविधेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

कामाला गती द्या
या सेवा रस्त्याची पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्ती ठेकेदारच करणार आहे. काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे. कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. समीर लॉन्स परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळा तोंडावर येऊनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– कामशेत पोलिसांची कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
– संतापजनक घटना ! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर लोणावळ्यात गुन्हा दाखल
– देहूरोड आयुध निर्माणी फॅक्टरी परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
– राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

Next Post

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.