जुन्या मुंबई-पुणे मार्गावर मंगळवारी (27 सप्टेंबर) मध्यरात्री बोर घाटात शिंग्रोबा मंदिराच्या विरुद्ध दिशेला असलेल्या उतारावरील खिंडीत एका ट्रकचा भयंकर अपघात ( Accident ) झाला. हा अपघात इतका विचित्र होता की यात ट्रकचा चालक केबिनमध्ये पुरता फसला होता. त्या ट्रक चालकाला अंधाऱ्या रात्री अपघातग्रस्त ट्रकमधून सुरक्षितपणे बाहेर काढणारे ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी‘ संस्थेचे सदस्य हे देवदूतच ठरलेत. ( Accident on Mumbai-Pune Old Highway )
हेही वाचा – ‘रात्री अपरात्री फोन आला तर नक्की उचला, कदाचित तो फोन मदतीसाठी हाक असेल’
मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास मुंबई-पुणे जुण्या महामार्गावर बोर घाटात शिंग्रोबा देवस्थानाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या उतारावर खोपोलीच्या दिशेने येणाऱ्या MH 09 EM 6974 ट्रकवरचे संदेश रणभिसे या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तीव्र उतारावर असलेल्या डोंगराच्या कड्यावर आदळला. ट्रक कड्यावर जोरदार धडकल्याने ट्रकची समोरील बाजू दबून चालक त्यात केबिनमध्ये अत्यंत विचित्र पद्धतीने अडकला होता.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या घटनेची माहिती मिळताच, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग पोलीस बोरघाट, लोकमान्य हॉस्पिटलची टीम, खोपोलीतील काही युवक आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या सदस्यांनी रात्रीच्या अंधारात खूप वेळ शिकस्त करुन चालकाला बाहेर काढले. त्याच्या पायाला गंभीर मार लागल्याने त्याला तातडीने नवी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. ( Accident on Mumbai-Pune Old Highway Truck Driver Life Saved )
अधिक वाचा –
दुर्दैवी! कामशेत येथे रेल्वे अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू
Video : मोठी बातमी! जुण्या मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, एकजण दगावल्याची भीती