पुणे शहरातील ( Pune City ) प्रसिद्ध भिडे पुलाजवळ ( Bhide Bridge ) नदीपात्रातील मोकळ्या जागेत सापडलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली असून या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. सदर तरुणाचा खून झाला असून त्याच्या मृत्यूबाबतचे मावळ कनेक्शन समोर आले आहे.
मामेभावाने त्याच्या साथीदारांशी संगनमत करून सदर तरुणाचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. नरेश गणेश दळवी (वय 30), अजय शंकर ठाकर (वय 25), समीर कैलास कारके (वय 26, सर्वजण राहणार उर्से. ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गणेश सुरेश कदम (वय 35, रा. अमृतेश्वर मंदिराजवळ, शनिवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ( Three Arrested For Murder Of Young Man )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, आरोपी नरेश दळवी हा मृत गणेश कदमाचा मामेभाऊ आहे. कदम याचा लॉन्ड्री व्यवसाय आहे. दळवी आणि कदम यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दळवीने कदमला नदीपात्रात दारू पिण्यासाठी बोलावले होते. तेव्हा दळवी आणि त्याच्या इतर साथीदारांनी कदम याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
हेही वाचा – अरे देवा..! म्हशीने घरासमोर शेण टाकले म्हणून दोन कुटुंबांत फ्री-स्टाईल हाणामारी
डेक्कन पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त रमाकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, सहायक निरीक्षक कल्याणी पाडोळे, उपनिरीक्षक गणेश मोरे, दत्तात्रय सावंत, नीलेश पाटील, हवालदार धनश्री सुपेकर, शेखर कोटकर, राम गरूड, रोहित मिरजे, गणेश तरंगे आदींनी ही कारवाई केली. ( Three Arrested For Murder Of Young Man By His Uncle Brother At Bhide Bridge Pune )
अधिक वाचा –
लोणावळा पोलिस चौकीबाहेर राडा, वाद मिटवायला गेलेल्या पोलिसालाही धक्काबुक्की, गुन्हा दाखल
अरे देवा..! म्हशीने घरासमोर शेण टाकले म्हणून दोन कुटुंबांत फ्री-स्टाईल हाणामारी