पुणे ( Pune City ) शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात ( Pune District ) डम्पर, ट्रक, हायवा अशी मोठमोठी चारचाकी वाहने चोरणाऱ्या ( Stealing Four Wheelers ) टोळीच्या म्होरक्याला कोथरूड पोलिसांकडून ( Kothrud Police ) गजाआड करण्यात आले आहे. सदर आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने चाकण, लोणावळा ग्रामीण, बिबवेवाडी, पौड पोलीस ठाण्यातून मोठी वाहने चोरली आहेत.
कुशाल अभिमन्यू जाधव (वय 33, रा. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच यापूर्वी कुशाल जाधव याचा साथीदार गणेश पुरी (रा. मुंढवा) याला अटक करण्यात आली आहे. जाधव हा अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. परंतू आज अखेरीस तो कोथरूड पोलिसांच्या तावडीत सापडला. ( Head of Gang Stealing Four Wheelers Has Been Caught By Kothrud Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोथरूड पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते, त्यावेळी कुशाल जाधव हा चांदणी चौक परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली.
हेही वाचा – धक्कादायक! अवघ्या ‘इतक्या’ हजारांची लाच घेताना कुसगाव खुर्द येथील सरपंच, ग्रामसेवकाला रंगेहात अटक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी, अंमलदार अजिनाथ चौधरी, संजय दहीभाते, आकाश वाल्मिकी, विष्णू राठोड, अजय शिर्के, शरद राऊत, मंगेश शेळके, शितकाल यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. ( Head of Gang Stealing Four Wheelers In Pune City And District Has Been Caught By Kothrud Police )
अधिक वाचा –
लोणावळा शहर लई भारी..! इंडियन स्वच्छता लीगमध्ये लोणावळा नगर परिषद ‘अव्वल’
भारतात आजपासून 5G सेवेला सुरुवात, पण तुमच्या-आमच्या मोबाईलवर 5G चालणार का? जाणून घ्या
View this post on Instagram